जुन्या काळात मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवले जायचे. तसेच त्यामध्ये पदार्थ साठवले जायचे. मात्र हळूहळू त्यांची जागा स्टील, हिंडालियम, अल्युमिनियमच्या पातेल्यांनी घेतली. मात्र आता पुन्हा एकदा मातीची भांडी वापरण्याचा ट्रेंड आलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आवडीने आणलेली भांडी कशी वापरावी किंवा त्यांना स्वच्छ कसे करायचे हे अनेकांना माहित नसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतर भांड्यांप्रमाणे याला काथ्याने किंवा साबणाने घासून काढता येत नाही. मातीची भांडी घासण्यासाठी काही ठराविक गोष्टींचा आणि पद्धतींचा वापर करावा लागतो. चिवट डाग असलेली किंवा स्वयंपाक केल्यानंतर मातीची भांडी कशी स्वच्छ करायची याबद्दल इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @youtube_wala_sam नावाच्या अकाउंटने काही टिप्स शेअर केल्या आहेत. त्या पाहू.

हेही वाचा : Kitchen tips : स्वयंपाक घरातील मच्छीचा वास कसा घालवावा? पाहा या ४ सोप्या टिप्स

मातीची भांडी कशी स्वच्छ करावी :

  • सर्वात पहिले मातीच्या भांड्याला लागलेले खरकटे पाण्याने धुवून काढून टाकावे.
  • आता भांड्यावर साबणाचा वापर न करता बेसन, ज्वारीचे पीठ किंवा राख अशा गोष्टींचा वापर करावा.
  • भांडी घासण्यासाठी नारळाच्या शेंडीचा किंवा मऊ स्पंजचा उपयोग करून भांडी स्वच्छ घासून घ्या.
  • शेवटी घासलेली मातीची भांडी पाण्याने स्वच्छ करून घ्या.
  • मातीच्या भांड्यांचा चिवटपणा निघून जाण्यास मदत होईल.

परंतु तरीही भांड्यांना वास येत असल्यास काय करायचे ते पाहा.

मातीच्या भांड्यावर लिंबू घासून भांडी पाण्याने धुवून घ्या. यामुळे जर थोडाफार चिवटपणा राहिला असेल तर तो निघून जाईल आणि भांड्यांना कोणताही खरकटा वास राहणार नाही.

तुम्हीही जर मातीची भांडी वापरत असाल तर त्यांना स्वच्छ करण्यासाठी व्हिडीओमध्ये दाखवलेल्या टिप्सचा वापर करून पाहा.

हेही वाचा : Kitchen hack : यापुढे चहा किंवा दूध कधीही उतू जाणार नाही; फक्त ‘ही’ भन्नाट युक्ती वापरून पाहा…

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @youtube_wala_sam नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या किचन टिप्सच्या व्हिडीओला २.६ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen tips how to clean cooking clay pots and vessel at home try these simple hacks dha