Kitchen Tips And Hacks : स्वयंपाक करणं जरी वेळ खाऊ आणि काहींसाठी कंटाळवाणे काम असले तरी त्याहून कठीण काम म्हणजे भांडी स्वच्छ करणे. अनेकदा स्वयंपाक करताना भांडी करपतात किंवा खूप खराब होतात. अशावेळी किती घासली, रगडली तरी भांड्यातील काळपटपणा काही केल्या कमी होत नाही, विशेषत; चपातीचा तवा रोजच्या वापरामुळे खूप खराब किंवा काळा पडतो. अशावेळी त्यावरील काळपटपणा काढणे खूप कठीण होऊ बसते. त्यामुळे आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील काळा पडलेला, खराब तवा काही मिनिटांत स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात आणि वेळेत हा तवा नव्यासारखा चमकवू शकता.
बऱ्याचदा किचनमधील तुमचे काम सोपे करणाऱ्या अशा काही ट्रिक्स असतात ज्या तुमच्यापैकी अनेकांना माहित नसतात. त्यामुळे किचन स्वच्छ करण्यात तुमचाही खूप वेळ जातो. पण या ट्रिक्सने तुम्ही काही मिनिटांत किचनमधील भांडी चकाचक करु शकता.
१) व्हिनेगर
करपलेला तवा चमकवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता. यासाठी तुम्ही तवा सर्वात आधी गॅसवर चांगला तापल्यानंतर त्यावर व्हिनेगर घाला आणि स्क्रबरच्या मदतीने तो घासून घ्या, ज्यामुळे काही सेकंदाच तुम्हाला फरक दिसेल.
२) बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याच्या मदतीनेही तुम्ही तवा किंवा काळी पडलेली भांडी चमकवू शकता. यासाठी तव्यावर बेकिंग सोडा घालून त्यावर लिंबू पिळा आणि गरम पाण्याच्या मदतीने घासणीने व्यवस्थित घासून घ्या. असं केल्याने तव्यावरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.
पण स्वयंपाक करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास तवा काळा पडणार नाही.
चपातीचा तवा फक्त चपातीच शेकवण्यासाठी वापरा, त्यावर भाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ गरम करु नका.
तव्याचा वापर करुन झाल्यानंतर तो स्वच्छ धुवून पुसून ठेवा, नुसताच धुवून ओलसर ठेवलात तर त्यावर गंज चढू शकतो. ज्यामुळे तव्यावरील कोटिंग खराब होते, अशाने तव्यावर चपात्या चिकटतात आणि खराब होतात.
अशाप्रकारे तुम्ही वरील टिप्स फॉलो करुन तवा नेहमी स्वच्छ ठेवू शकता.