Tips To Make Curd At Home: अनेकजणांना जेवणाबरोबर दही खाण्याची सवय असते, तर काहीजणांना दही दिवसभरात कधीही इच्छा झाली तर तेव्हा खायलाही खूप आवडते. त्यामुळे रोजच्या डाएटमध्ये समावेश असणारे दही घरीच बनवण्याचा प्रयत्न गृहिणी करतात. पण कधीकधी वातावरणातील बदलानुसार दही नीट बनत नाही, विशेषतः हिवाळ्यात दही पातळ होते असे तुम्ही बऱ्याचदा ऐकले असेल. यावर काही सोप्या टिप्स वापरून दही घट्ट आणि गोड बनवता येईल. कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.
घरी दही बनवताना पुढील टिप्स नेहमी लक्षात ठेवा:
आणखी वाचा: ‘या’ आजारांमध्ये आले खाणे ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
ताजे दूध
दही बनवताना नेहमी ताजे दूध वापरावे. जर दही बनवताना घरातील शिळे दूध वापरले तर दही आंबट होण्याची शक्यता असते. त्यामुळे दही बनवताना ताजे दूध वापरावे.
मातीचे भांडे
दही बनवण्यासाठी मातीचे भांडे वापरावे, कारण त्यामध्ये थंडावा असतो.
कोमट दुधात विरझण घाला
अनेकजण उकळलेल्या दुधात विरझण घालतात, ज्यामुळे दही आंबट होऊ शकते. त्यामुळे नेहमी कोमट दुधात विरझण घालावे.
आणखी वाचा: फळं खाताना ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका; त्यामधील पोषकतत्त्व वाया घालवणाऱ्या चुका लगेच जाणून घ्या
उष्णता असणाऱ्या ठिकाणी दही लावलेले भांडे ठेवा
दही व्यवस्थित तयार व्हावे यासाठी दुधात योग्य प्रमाणात बॅक्टेरिया निर्माण होणे आवश्यक असते. यासाठी दही लावलेले भांडे उष्णता असणाऱ्या ठिकाणी (उदरहरणार्थ गॅस जवळ) ठेवा. यामुळे दुधात बॅक्टेरिया निर्माण होण्यास मदत मिळेल. यासह सतत दही लावलेल्या भांड्याची जागा बदलणे टाळा, ते एका ठिकाणी स्थिर ठेवा.