sharpness of mixer blade Viral video: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्याला सर्वत्र अत्याधुनिक व गरजेच्या वस्तू पाहायला मिळतात. यानुसार तुम्हीही आता मिक्सरच्या भांड्यात मीठ टाका आणि काय कमाल होते पाहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असले मिक्सरच्या भांड्यात मीठ टाकून काय होणार आहे, तर पूर्वीच्या काळी मसाला किंवा स्वयंपाक घरातील इतर पदार्थ वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा परंतु, सध्या याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. यातच नेमकी गडबड होत असेल म्हणजे कितीदाही मिक्सर फिरवून आपल्याला हवा तेवढा बारीक, सफाईदारपणे एखादा पदार्थ वाटला जात नसेल, तर मात्र सगळाच गोंधळ उडतो. याचं कारण म्हणजे मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार कमी होणं. यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.
मिक्सरच्या भांड्यात मीठ टाका अन् कमाल पाहा
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरच्याघरी चाकू, विळी यांना जशी आपण धार लावतो, तशाच पद्धतीने मिक्सर भांड्याच्या ब्लेडलाही धार लावता येते. या गृहिणीने अगदी साधा उपाय सांगितला असून यासाठी तुम्हाला काहीही खर्च येणार नाहीये. तुम्हाला यासाठी फक्त मीठ हवं आहे, आणि मीठ हे प्रत्येक घरात असतंच. आता तुम्हाला नेमकं काय करायचं तर, एक मिक्सरचं भांड घ्या, त्यात दोन चमचे मीठ टाका आणि भांडं मिक्सरवर दोन ते तिन वेळा फिरवा. असं चार ते पाच वेळा केल्यानंतर तुम्हाला फरक कळेल, मिक्सरच्या ब्लेडला धार आली असेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादन असल्यामुळे मिक्सर ग्राइंडर व्यवस्थित साफ करता येत नाही, यावेळी ग्राइंडरही तुम्ही अशाच प्रकारे मीठानं स्वच्छ करु शकता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Clothing Hacks jugaad: कपडे ठेवायला कपाटात जागा नाही? एका प्लॅस्टिक बाटलीत नीट मावतील तुमचे सर्व कपडे, पाहा व्हिडीओ
@madhuriscreativeworld21 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.