Kitchen Jugaad viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये एका गृहिणीने रात्री झोपताना गॅसवर कांदे कापून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. रात्री झोपण्याआधी किचनमध्ये गॅसवर कांदे ठेवा आणि सकाळी कमाल पाहा. मात्र, नेमकी कमाल काय होते हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर पाहूयात यामुळे नेमकं काय होतं. आतापर्यंत कांदा हा आपण जेवणातच वापरला आहे. मात्र, हाच कांदा आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करू शकतो. यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.

Pune IT Engineer and Family Attacked by Mob on Lavale-Nande Road crime News Video Viral
पुण्यात टोळक्यांचा थरार! आयटी इंजिनिअरच्या कुटुंबावर ४० जणांचा हल्ला; रात्रीच्या काळोखात रॉड, दगड अन् काठ्या घेऊन पाठलाग
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Three people died due to lightning in Kalyan Murbad
कल्याण, मुरबाड येथे वीज पडून तीन जणांचा मृत्यू
Buldhana, brother sister poisoning Buldhana,
विषबाधेमुळे अल्पवयीन बहीण-भावाचा मृत्यू; आदिवासी कुटुंबातील ८ सदस्यांना…
palm beach traffic jam youth death
पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब
young computer engineer died in a collision with a dumper
डंपरच्या धडकेत संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू, नगर रस्त्यावर अपघात; डंपरचालक पसार
youth threatens to kill family over old conflict at shahad near kalyan
कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून  कुटुंबाला ठार मारण्याची तरूणाची धमकी
Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद

रात्री झोपण्याआधी न विसरता गॅसवर ठेवा कांदे

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेनं कांद्याच्या फोडी केल्या आहेत. त्यानंतर त्या सगळ्या फोडी एक एक करून गॅस आणि किचनभर पसरवून ठेवल्या आहेत. रात्रभर हे कांदे किचनभर असेच ठेवायचे आहेत. सकाळ झाली की ते उचलून किचन स्वच्छ पुसून घ्यायचे आहे.

आपल्या कुटुंबाला धोक्यापासून वाचवा

हा उपाय केल्यामुळे किचनभर फिरणारे उंदीर, पाल, झुरळ असे प्राणी-कीटक किचनपासून दूर राहतील. यासारखे जीव किचनभर फिरत राहिल्याने त्यांच्यापासून धोका आहे, त्यांच्या घाणीमुळे आपण आजारी पडण्याची शक्यता असते. मात्र, कांद्याच्या उग्र वासामुळे उंदीर, पाल, झुरळ किचनकडे बिलकूल फिरकणार नाहीत. त्यामुळे यांच्यापासून असलेला धोका तुम्हाला टाळता येऊ शकतो, असं या गृहिणीने सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: मिक्सरमध्ये मीठ टाकताच झाली कमाल! VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

@simplymarathi31 यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.