How To Save Electricity Bill Through Fridge:  तुम्ही आतापर्यंत हार्पिकचा वापर बाथरूम-टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी केला असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचा वापर फ्रिजमध्ये केल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण टॉयलेट चकाचक करणारं हार्पिक फ्रिजला लावल्याने तुमचं लाइट बिल कमी होईल. एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. पण या व्हिडीओमागे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊया…

किचनची साफसफाई रोज होत असली तरी घरातल्या कानाकोपऱ्यात बरीच धूळ, घाण साचते. फ्रिजचं रबर साफ करायला बरेचजण विसरतात. यामुळे रबर खडबडीत दिसतं. यामुळे दरवाजा व्यवस्थित बंद होत नाही आणि कुलिंगसुद्धा कमी होतं. परिणामी लाईट बिल जास्त येत. पण आता फ्रीजमुळे लाईट बिल वाढण्याचं टेन्शनच नाही. कारण हार्पिक वापरल्याने फ्रिजमुळे जास्त येणारं तुमचं लाइट बिल कमी होईल. आता हे कसं शक्य आहे, त्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shreyas Iyer came to bat with Sunglasses brutally trolled
Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
png jewellers ipo analysis
पीएनजी ज्वेलर्सच्या ‘आयपीओ’त शेवटच्या दिवशी ५९.४१ पट भरणा
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर
Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
Gold Silver Price
Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव उतरले, १० ग्रॅमची किंमत पाहून ग्राहक आनंदी!

फ्रिजमध्ये टॉयलेट क्लिनर लावताच झाली कमाल

रेफ्रिजरेटर सहसा प्रत्येकाच्या घरात असतात. शहराशिवाय आता खेड्यापाड्यातील अनेक घरांमध्येही तो दिसतो. फ्रीज वापरताना तो खूप घाण होतो आणि तो पुसण्यासाठी आपण अनेक पद्धती अवलंबतो. पण दारावरील रबराकडे लक्ष देणारे फार कमी जण असतील. फ्रीजच्या दरवाजाचे रबर खूप लवकर घाण होते. त्यामुळे तुम्ही हार्पिकचा वापर करा. एका भांड्यात हार्पिक घेऊन एका जुन्या टुथब्रशच्या मदतीने ते फ्रिजच्या रबरमध्ये घासा. संपूर्ण रबर असा स्वच्छ करून घ्यायचा आहे. यामुळे रबरमध्ये असलेली सर्व घाण स्वच्छ होईल. काही मिनिटांतच रबर नव्यासारखा चकचकीत होईल आणि तुम्ही दरवाजा बंद करून पाहिला तर तो आधीपेक्षा घट्ट लागेल. त्यातील थंड हवा बाहेर येणार नाही आणि फ्रिजला आतील तापमान थंड ठेवण्यासाठी जास्त वीज लागणार नाही. साहजिकच यामुळे तुमचं लाइट बिलही कमी होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: सॅनिटरी पॅड फ्रिजमध्ये ठेवा आणि असा वापरा; महिलाच नव्हे तर पुरुषांसाठीही मोठा फायदा

सिम्पली मराठी युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.