Kitchen jugaad video: आपल्या सर्वांच्याच घरात दूध असतं, चहासाठी म्हणा किंवा नुसतं दूध पिण्यासाठी ते रोज घरात येतं. दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला दुधावर टिकली लावायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दुधावर टिकली कशाला? तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.
दुधावर टिकली लावल्यानं नक्की काय होतं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही अगदी स्पष्टपणे पाहू शकता, या गृहिणीने सर्वात आधी टिकलीचं पाकीट घेतलं आहे आणि एका वाटीत थोडंसं दूध,साय. यानंतर तिनं थोडंसं दूध तिच्या हातावर लावलं आहे. दूधाऐवजी तुम्ही सायही वापरू शकता, असं ती सांगते. पुढे आता टिकलीच्या पाकिटातील एक टिकली काढून तिने हाताला दूध लावलेल्या भागावर लावली. आता याचा फायदा काय, तर बऱ्याच महिलांना कपाळावर टिकली लावल्याने त्वचेवर खाज सुटणे किंवा पुरळ येणे, यासारख्या अॅलर्जीचा सामना करावा लागतो. तर मग अशा महिलांनी आजच हा उपाय करून पाहा.
महिलांच्या मोठ्या समस्येवर उपाय
महिलेने माहितीसाठी हे सगळं हातावर करून दाखवलं आहे. मात्र, तुम्ही हे कपाळावर करून पाहा. सर्वात आधी कपाळावर जिथे खाज येते तिथे दूध लावा आणि मग त्यावर टिकली लावा. दूध लावल्यामुळे त्वचा लाल होणे, त्वचेला खाज येणे यासारख्या अॅलर्जीचा पुन्हा तुम्हाला त्रास होणार नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: जुना झाडू रात्रभर पाण्यात भिजवा आणि कमाल पाहा; भरपूर पैसे वाचतील अन्…
@IndianVloggerPinki यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)