Kitchen Jugaad Video: दुधाचे आपल्या आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपणास ठाऊकच आहे. वेगवेगळ्या पद्धतीने कच्च्या दुधाचा वापर करता येतो आणि त्वचेसाठी कच्चे दूध हे वरदान ठरते. चेहऱ्यावर उजाळा आणण्यासाठी अनेक लोकं दुधाचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का, आरोग्यासाठी उपयोगी असलेल्या दुधाला किचन सिंकमध्ये टाकल्याने काय होते? याचा परिणाम पाहून तुम्हीही विचारात पडाल. याचाच एका गृहिणीने जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, आता सोशल मिडीयावर एका गृहिणीने किचन जुगाडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा दूध आणि किचन सिंकचा जुगाड आहे. स्वयंपाकघरातील सगळ्यात अस्वच्छ ठिकाणांमध्ये किचन सिंक असते. सिंक ही अशी जागा आहे जिथे ओलाव्यामुळे जंतूंना वाढण्याची पुरेशी संधी मिळते. अनेकदा काही लोकांच्या स्वयंपाकघरातील सिंक चिकट आणि घाण दिसते. जर तुम्ही दररोज सिंक साफ केला नाही तर तुम्ही आजारी पडू शकता. किचन सिंकवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी गृहिनी अनेक उपाय करत असतात. तरीही त्यांना फायदा होत नाही.

Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
Viral video beating of two people in a moving bus video of incident happening in bhopal shocking video
लालबागनंतर भोपाळमधून संतापजनक प्रकार; चालू बसमध्ये ड्रायव्हरला लाथाबुक्क्यांनी मारलं; थरारक VIDEO समोर
nashik video
नाशिकच्या आजोबा एसटी बसमध्ये चक्क छत्री उघडून बसले, Viral Video एकदा पाहाच
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ

(हे ही वाचा : रोज दुधाची पिशवी फोडताना तुम्हीही ‘अशी’ चूक करता का? ‘हा’ VIDEO एकदा पाहाच! )

किचन सिंक जर खूप खराब असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण आता काळजी करण्याची गरज नाही. गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी किचन सिंकमध्ये दूध टाकून सिंक स्वच्छ केलं आहे का? नाही ना.. मग एकदा सिंकमध्ये दूध टाकून पाहा…

येथे पाहा व्हिडीओ

Vamshi green Kitchen या युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गृहिणीने किचन सिंकमध्ये दूध टाकलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, अर्धा वाटी दूध घेवून त्यात एक चमच मीठ घालायचं आहे आणि दोन्ही मिश्रण मिक्स करुन चमचाच्या साहाय्याने किचन सिंकमध्ये सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच त्यात पाणी घालून धुवून काढू नये, अशा सुचनाही महिलेने दिल्या आहेत. मिश्रण टाकल्यानंतर १० मिनिटे थांबून थोड्या वेळाने कपडा किंवा स्क्रबला व्हिनेगर लावून किचन सिंकला फिरवून घ्या. यामुळे तुमचा किचन सिंक नीट साफ होईल आणि चमकून उठेल, असे या व्हिडीओमध्ये गृहिणीने दाखवले आहे.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)