Kitchen Jugaad viral Video: चहा पावडरचा संबंध कधी येतो तर चहा बनवण्यासाठी. चहा पावडरचा वापर आपण रोजच करतो. आतापर्यंत तुम्ही चहा पावडरचा वापर चहा बनवण्यासाठी केला असेल पण कधी सिलेंडरवर चहापत्ती टाकली आहे का? नाही ना…मग एकदा सिलेंडरवर चहा पावडर नक्की टाकून पाहा. सिलेंडरवर चहा पावडर टाकून अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.यासाठी एका गृहिणीने किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.
प्रत्येक घरात सिलेंडरचा वापर जेवण बनवण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलेंडर ठेवण्यात येते. हे सिलेंडर कडक लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे ते वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलेंडर जिथे ठेवले जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात. सिलिंडरच्या डागामुळे स्वयंपाकघरातील फरशी अस्वच्छ दिसते. मात्र, हे डाग साफ करणे कोणत्या मोठ्या टास्कपेक्षा कमी नाही. फरशी पुसल्यानंतरही हे डाग सहसा निघत नाही. पांढऱ्या फरशीवर ते लगेच उठून दिसतात. हे डाग काढण्यासाठी हा जुगाड तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर आहे.
गृहीणीनं दाखवलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका भांड्यात चहा पावडर घ्या आणि अर्धा ग्लास पाणी टाकून उकळून घ्या. उकळी यायला लागल्यावर त्यात एक चमचा मीठ टाका आणि गॅस बंद करुन ते व्यवस्थित मिक्स करुन घ्या. यानंतर ते थंड होऊद्यात, थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. गाळून घेतलेल्या पाण्यात आता दोन चमचे फिनायल टाका. आता सिलेंडरमुळे ज्या ठिकाणी डाग पडले आहेत त्याठिकाणी हे पाणी स्प्रे करा. यानंतर जादू बघा काही वेळातच हे डाग नाहिसे होतात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: दागिने चपातीच्या पिठात नक्की ठेवा; काय आहे फायदा VIDEO एकदा पाहाच
@AvikaRawatFoods यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.