Viral video: दूधाला पूर्णान्न म्हटलं जातं. अगदी बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या सर्वांच्याच घरी सर्वाधिक दूध किंवा दुधाचे पदार्थ वापरले जातात. पण तुम्ही कधी दुधात बांगड्या टाकून पाहिल्या आहेत का? दुधात बांगडी टाकण्याचा मोठा फायदा आहे. याचा परिणाम आश्चर्यचकीत करणारा असा आहे. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. दुधाच्या भांड्यात सोन्याच्या बांगड्या टाकल्यानंतर अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल.

आपण रोजच्या वापराला सोन्याचे लहान मंगळसूत्र, चेन, कानातले, बांगड्या असे काही ना काही आवर्जून वापरतो. इतकेच नाही तर चांदीची जोडवी, पैंजण, ब्रेसलेट असेही वापरतो. रोजच्या रोज या वस्तू वापरुन त्या काहीशा काळ्या पडायला लागतात. सतत येणारा घाम, प्रदूषण, धूळ यांच्याशी संपर्क आल्याने या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पॉलिश जाते आणि त्याची चकाकी कमी होते. धावपळीत अनेकदा आपल्या हे लक्षातही येत नाही. मात्र इतर कोणाचा एखादा दागिना पाहिला की आपण घातलेल्या गोष्टी किती काळ्या पडल्या हे आपल्या लक्षात येते.

Anand Mahindra React on Dosa Printing Machine
फक्त मशिनमध्ये टाकायचं पीठ, मग कुरकुरीत गरमागरम डोसा छापून तयार; पाहा आनंद महिंद्रांनी शेअर केलेला VIRAL VIDEO
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
Little Boy Viral Video
“तू मोठा झाल्यावर किती बायका करणार?” चिमुकल्यानं दिलं भन्नाट उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल; VIDEO एकदा पाहाच
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी

अशावेळी आपले दागिने स्वच्छ करण्यासाठी ते सोनाराकडे देऊन पॉलिश करण्याचा पर्याय असतोच. पण यासाठी बरेच पैसे लागतात. विशेष पैसे खर्च न करताही घरच्या घरी आपले रोजच्या वापरातले दागिने चमकावेत असे वाटत असेल तर आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे दागिन्यांना एकप्रकारची नवी झळाळी येण्यास मदत होईल आणि आपल्यालाही या दागिन्यांकडे पाहून छान वाटेल. पाहूयात दागिने साफ करण्याची सोपी ट्रिक..

तुम्हाला करायचं काय आहे, तर एका भांड्यात थोडं दूध घ्या. त्यात हळद मिसळा. या बांगड्या टाका किंवा एका ब्रशवर दूध आणि हळदीचं मिश्रण घेऊन ते बांगडीवर घासा. संपूर्ण बांगडी दूध-हळदीच्या मिश्रणाने नीट घासा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंकमध्ये फक्त एकदा कात्री टाका; पैशांची होईल मोठी बचत

या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. @AvikaRawatFoods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

तुम्ही अशा पद्धतीने एकदा बांगड्या स्वच्छ करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)