तुम्ही आतापर्यंत प्लॅस्टीकची पिशवी भाजीसाठी, डब्यासाठी वापरली असेल. मात्र याच पिशवीचा असा एक वापर ज्यामुळे तुमची सर्वात मोठी समस्या दूर होईल. प्लॅस्टिक पिशवीत पाणी भरून ही पिशवी तुम्ही दरवाजाला लटकवा. या किचन जुगाडा चा तुम्हाला मोठा फायदा आहे. कित्येक गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा किचन सिंक आणि तांदळाचा जुगाड. याचा मोठा फायदा आहे. या उपायाचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही थक्क व्हाल.
जर तुम्ही घराच्या खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवले तर माश्या आनंदाने तुमच्या पाहुण्या म्हणून येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत, त्या घरांचे दरवाजे दिवसातून दहा वेळा उघडले आणि बंद केले जातात. अशा परिस्थितीत हाऊस फ्लाईज तुम्हाला आजारी पाडण्यासाठी जगभरातून घाण आणतात. जरी तुम्हाला रोगाचा धोका दिसत नसला तरी त्यांचा आवाज तुम्हाला झोपू देत नाही आणि शांतपणे बसू देत नाही. जर तुम्हालाही माशांचा त्रास होत असेल तर हा घरगुती उपाय ज्यामुळे या माशा तुमच्या घरातून पळून जाण्यास भाग पाडतील.
रात्री दरवाजावर लावा पाण्याची पिशवी
या पिशवीतील पाण्यात टाकलेले सिल्वहर फॉईलचे गोळे चमकताना दिसत आहेत. असं काही पाहिल्यानंतर माश्या त्याच्या जवळ येत नाही. काहीतरी धोका मानून त्या तिथून दूर पळतात. जेव्हा तुम्ही अशी पिशवी एखाद्या ठिकाणी लटवकता तेव्हा तिथं माश्या फिरकतही नाही. यामुळे घरात किंवा तुमच्या घराच्या परिसरात येणाऱ्या माश्यांचा त्रास संपेल. हा उपाय माश्यांचा दूर पळवण्याचा सोपा उपाय आहे, असा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kanjivaram: खरी कांजीवरम साडी कशी ओळखायची? ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा अन् क्षणात ओळखा
आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)