how to clean gas burners at home  प्रत्येक घरामध्ये गॅस शेगडी असतेच. शेगडीमुळे महिलांची कामे खूपच सोपी झाली आहेत. गॅस शेगडीशिवाय आपण स्वयंपाकाची कल्पनाही करू शकत नाही. पण बर्नरवर स्वयंपाक करताना बर्नरवर अनेक वेळा तेल किंवा ग्रेव्ही सांडते, त्यामुळे बर्नरची छिद्रे ब्लॉक होतात. या कारणाने ज्योत कमी जास्त होते. जर वाईटपद्धतीने ते खराब झाले असेल तर त्यामधून गॅस येत नाही. यासाठी गॅस स्टोव्हचा बर्नर साफ करणे खूप महत्वाचे आहे. गॅस स्टोव्हचे बर्नर साफ करण्याचे दोन सोपे मार्ग येथे आहेत. या घरगुती मार्गाने बर्नर लगेच साफ देखील होईल आणि त्याला वास देखील येणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

गृहीणीने दाखवला भन्नाट जुगाड

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.गॅस स्टोव्हवरील डाग दूर करण्यासाठी लिंबू हा उत्तम घरगुती उपाय आहे. लिंबूप्रमाणे ENO देखील हट्टी डागकाढण्यास मदत करतो.

नक्की काय करायचं?

यासाठी प्रथम एका भांड्यात गरम पाणी घ्या. आता त्यात लिंबाचा रस घाला. यानंतर इनो फ्रूट सॉल्ट टाका. आता या द्रावणात बर्नर किमान दोन तास भिजवा. आता दोन तासांनंतर, बर्नरला जुन्या टूथब्रशने डिश वॉशिंग लिक्विड किंवा साबणाच्या मदतीने साफ करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेटल स्क्रब देखील वापरू शकता.आता बर्नर वाळवा आणि मगच त्याचा वापर करा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

@twistytadka5519 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.