Viral video: तुम्ही वापरत असलेलं मीठ कधी गरम करुन पाहिलंय का ? नाही ना..मग मीठ गरम करून एकदा नक्की पहा. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल पण अशा एक जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मीठ गरम करण्याचा मोठा फायदा आहे. याचा असा परिणाम की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल.
मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही. जेवणाला स्वाद आणणारे मसाले आणि मीठ हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचे असतात. यातला एखादा पदार्थ जरी कमी पडला ते जेवण बेचव लागते. मीठ हा असा पदार्थ आहे की त्याला आपण व्यवस्थित सुक्या बरणीत भरुन साठवून ठेवतो. काहीवेळा हवामानातील दमटपणामुळे मिठाच्या बरणीला ओलसरपणा लागून मीठ खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी हे ओले झालेले मीठ फेकून देण्यापेक्षा एक सोपी ट्रिक वापरुन आपण मिठातील ओलसरपणा काढू शकतो.
ओलसर मीठ वापरणेही कठीण होते. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल आणि साखर , मीठाला पाणी सुटले असेल तर हा जुगाड नक्की ट्राय करा.
पहिली टीप
तुम्हाला काय करायचं आहे तर, सर्वप्रथम एका ताटामध्ये मीठ काढून घ्या. त्यात तांदूळ घेऊन दोन्ही मिक्स करा. आता हे मिश्रण एका हवाबंद डब्यात दोन दिवस ठेवून द्या. दोन दिवसांनी हे मिश्रण चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्या.अशाप्रकारे तांदूळ आणि मिठ वेगळे होईल आणि मीठाचा ओलसरपणा निघून जाईल.
दुसरी टीप
आता एवढी मोठी प्रोसेस करायला जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हा दुसरा जुगाड ट्राय करा. आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर, गॅसवर एक कढई किंवा पॅन ठेवा यामध्ये ओलसर झालेलं मीठ टाका. लक्षात ठेवा कढई जास्त गरम करायची नाहीये. फक्त मिनिटभरासाठी हे मीठ कढईत हलवून घ्या आणि थंड झाल्यावर हे मीठ तुम्ही वापरू शकता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad Video: सिलेंडरवर चहा पावडर टाकताच कमाल झाली; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
@simplymarathi31 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.
(सूचना – या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. लोकसत्ताचा याच्याशी संबंध नाही. लोकसत्ता याची हमी देत नाही. अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)