Kitchen Jugaad Video: मीठ हे जीवनाचे सार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण मीठामुळे स्वयंपाकाला चव येते. बिना मीठाचं अळणी जेवण कोणालाही खावसं वाटणार नाही. आपल्या शरीरासाठी जेवणातील मीठ हा सोडियमचा सर्वांत मुख्य स्त्रोत असतो. मीठ हे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असून आपल्या दैनंदिन जीवनातील रोजच्या खाण्यात मीठ असतेच. परंतु आज आम्ही तुम्हाला मीठ खाल्ल्यानं काय होतं, याविषयी माहिती देत नसून तर एका महिलेने मीठासंदर्भात दाखविलेल्या जुगाडाविषयी माहिती देत आहोत.
बहुतेक गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात मीठ आणि लाटण्याचा अनोखा वापर करून दाखवण्यात आला आहे. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय करायचं?
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने, एका ताटात लाटणं ठेवून एका कपामध्ये पाणी घेऊन त्यात मीठ टाकून त्याला चमचाच्या साहाय्याने पाण्यात मिक्स करुन घेतले आणि हे मीठाचं पाणी महिलेने लाटण्यावर टाकलं आहे. काही मीठ ताटात पडलं ते उचलून महिलेने लाटण्यावर टाकलं आहे. मीठ पाण्यात विरघळतं त्याप्रमाणे लाटण्यावरील पाण्याला लागलेलं मीठ विरघळेल. पण जर लाटण्यावरील लागलेलं मीठ विरघळलं नाही तर ते मीठ भेसळ आहे, ते तुमच्या खाण्यासाठी योग्य नाही, असे या पध्दतीने ओळखता येईल, असा दावा महिलेने केला आहे.
(हे ही वाचा : Jugaad Video: तुमच्या घरातील बल्बला एकदा किसणीवर घासून पाहा; परिणाम पाहून थक्क व्हाल )
आजकाल बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते. भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी घातक ठरतात. मिठातही भेसळ केली जाते. त्यात घातक रसायनांची मोठ्या प्रमाणात भेसळ होते. त्यामुळे खरं आणि खोटं मीठ ओळखण्यात अनेकांची धांदल उडते. जर आपल्याला असली आणि नकली मिठातील फरक जाणून घ्यायचं असेल तर, महिलेने सांगितलेला जुगाड तुम्ही घरी करुन पाहू शकता.
येथे पाहा व्हिडिओ
Tips ki duniya या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)