आतापर्यं तुम्ही तुमचे दागिने कपाटात, पेटीमध्ये लॉकरमध्ये ठेवले असतील, किंवा इतर लोकही हेच करतात हे एकल असेलच. मात्र, तुम्ही कधी लॉकरऐवजी टॉयलेट-बाथरूममध्ये दागिने ठेवून पाहिले आहेत का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल पण अशा एक जबरदस्त किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
घरात चोरी आणि दरोड्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका दागिने ठेवणे सुरक्षित मानत असतात. घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर सुरक्षित मानले जात असतात. त्यामुळे जास्त रक्कम असेल, दागिने वा महत्वाची कागद पत्रे ग्राहक बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देत असतात. बॅंकेचे लॉकर ग्राहकांना सुरक्षित वाटत असते. मात्र अजूनही अशी लोकं आहेत जी घरातच दागिने ठेवतात. त्यामुळे त्यांना नेहमी या दागिण्यांची चिंता असते, घराबाहेर पडताना मागे घरात दागिने असेच ठेवून जाणंही सुरक्षित नसतं. चोर घरातून दागिने चोरी करतील की काय अशी नेहमी भीती असते. मात्र एका गृहिणीने यावर हटके उपाय शोधलाय.
दागिने लॉकर नाही टॉयलेटमध्ये ठेवा
आता तुम्ही म्हणाल शी बाईईई टॉयलेट-बाथरूममध्ये दागिने कोण ठेवत. पण हा जुगाड पाहून तुम्हीही आता घराबाहेर जाताना हेच कराल. कसं ते पाहुयात. गृहिणीने या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, तिने वेगवेगळे ज्वेलरी बॉक्स घेतले आहेत. त्यात वेगवेगळे दागिने आहेत. ते सर्व दागिने तिने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये केले आहेत. अशाच पद्धतीने एकाच ज्वेलरी बॉक्समध्ये सर्व दागिने ठेवण्याचा सल्ला तिने दिला आहे. त्यानंतर हा बॉक्स एका कापडात गुंडाळा, असं तिनं सांगितलं आहे.
आता दागिन्यांचं टेन्शन विसरा
नंतर ही गृहिणी हा कापडात गुंडाळलेला ज्वेलरी बॉक्स टॉयलेटमध्ये घेऊन जाते. तिथं एक डस्टबिन आहे. जो स्वच्छ आणि पूर्ण रिकामा आहे. म्हणजे याआधी कचऱ्यासाठी हा डस्टबिन वापरलेला नाही. या डस्टबिनमध्ये ती हा बॉक्स ठेवते. त्यानंतर ती त्यावर साबणाचे रिकामे बॉक्स आणि रिकाम्या बाटल्या टाकते. जेणेकरून दागिन्यांचा बॉक्स पूर्णपणे झाकला जाईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: झोपण्याआधी गॅसवर ठेवा फक्त २ प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही
@IndianVloggerPinki युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.
(सूचना – या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. लोकसत्ताचा याच्याशी संबंध नाही. लोकसत्ता याची हमी देत नाही.)