How to Save LPG Gas: हल्ली स्वयंपाकाचा गॅस ही आपली अनेक गरजांपैकी एक महत्त्वाची गरज आहे. स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा म्हणजेच एलपीजीचा वापर करतो. दिवसभरात आपण खात असलेल्या बहुतांश गोष्टी या याच गॅसवर शिजवल्या जातात. मात्र, गॅस सिलिंडरची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक घरांमध्ये तर महिनाभर एक सिलिंडरही नीट चालत नाही. अशा परिस्थितीत अनेकजण गॅस वाचवण्याचा प्रयत्न करतात. एक गॅस सिलिंडर जास्त दिवस वाचवण्यासाठी आणि महिनाभर पुरवण्यासाठी एका महिलेने जबरदस्त जुगाड दाखविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी घरगुती गॅस सिलिंडर वाचविण्यासाठी कपाळाच्या टिकल्यांचा वापर केला आहे का? आता तुम्ही म्हणाल, एक छोटीशी टिकली तुमच्या घरातील गॅस सिलिंडर जास्त दिवस कसं काय वाचवू शकणार, परंतु एका महिलेने सोशल मिडियावर हा जुगाड दाखविला आहे. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो, असे या व्हिडिओतून दिसत आहे. सिलिंडर आणि टिकल्यांचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : Kitchen Jugaad: रात्री झोपण्यापूर्वी एकदा किचन सिंकमध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टी टाकून पाहा; तुमची मोठी समस्या होईल दूर! )

नेमकं काय करायचयं?

गृहिणीने व्हिडीओत दाखवल्यानुसार, अनेकदा गॅसच्या बर्नरमधून लाल रंगाची फ्लेम येते. यामुळे गॅस बर्नर खराब झाला आहे, असे समजते. यामुळे गॅसवर ठेवलेली भांडी सुध्दा काळी होतात आणि गॅससुद्धा वाया जातो. आता गृहिणीने सांगितल्यानसार, ज्या ठिकाणाहून लाल रंगाची फ्लेम येते त्या जागी तुम्हाला टिकली लावायची आहे. आणि मग गॅस सुरु करायची आहे. त्यामुळे टिकली हळूहळू जळू लागेल आणि टिकलीचा गम सुटेल. यामुळे बर्नरचा आतील भाग हलकं होते. यामुळे गॅसची फ्लेम लाल रंगाची पेटणार नाही, असा दावा महिलेने केला आहे. यामुळे गॅस वाया जाणार नाही आणि गॅसची बचत होईल, असे महिलेने सांगितले आहे.

पाहा व्हिडीओ

Indian Vlogger Pinki या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen tips in marathi how to save lpg gas cylinder in kitchen jugaad video viral pdb
Show comments