House cleaning ideas: आईस्क्रिम म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. सामान्यपणे आईस्क्रिम खाल्ल्यावर आपण आईस्क्रिमची काठी फेकून देतो. तसं या काठीपासून बरंच काही बनवता येतं. पण याचा मोठा फायदा टॉयलेटमध्येही आहे. एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे. ज्यात आईस्क्रिमची एक छोटीशी काठी तुमचं टॉयलेटमधील असं काम करेल, जे करताना तुम्हाला घाण वाटते.
घरात साफसफाई काढली कि गृहिणींच्या नाकी नऊ येतात, छोट्या मोठ्या जागेवरची साफसफाई होऊन जाते पण घरात काही अश्या ठिकाणी साफसफाई कारण म्हणजे मुश्किल होऊन बसतं, जस कि बाथरूम . बाथरूम हा घरातील सगळ्यात अस्वच्छ भाग असतो. साफ सफाईकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर अस्वच्छ होते. आरोग्याच्या दृष्टीने टॉयलेट-बाथरुम स्वच्छ असणे खूप गरजेचे आहे. छोट्या छोट्या वस्तू कधी कधी खूप मोठ्या कामाच्या असतात. तुम्हीही यापुढे लक्षात ठेवा की, आईस्क्रिम खाल्ल्यानंतर काठी फेकू नका. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
व्हिडीओत पाहू शकता महिलेने एक आईस्क्रिमची काठी घेतली आहे. त्याच्या एका टोकावर तिने डबल साइड टेप लावली आहे. आता ही आईस्क्रिमची काठी महिला टॉयलेटमध्ये घेऊन जाते. यानंतर टॉयलेट सीट कव्हरच्या खाली तुम्हाला ही काठी घट्ट लावायची आहे. व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे तुमचं घरगुती होल्डर तयार झालं. म्हणजे तुम्ही टॉयलेट कव्हर वरखाली करण्यासाठी याचा उपयोग करू शकता. आपल्याला हातांनी टॉयलेट सीट कव्हर वरखाली करताना घाण वाटते. पण यामुळे आता तुम्हाला ते अधिक सोपं झालं आहे, शिवाय तुमचे हातही घाण होणार नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तुम्हीही तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर ठेवता का? थांबा…डॉक्टरांनी सांगितला धोका
हा हटके जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. @seemafamilyvlog71 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी करून पाहू शकता. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.