Viral jugad video: मुलं नाही पण प्रत्येक मुलीच्या तोंडात हे वाक्य हमखास असतं ते म्हणजे माझ्याकडे कपडेच नाही…खरं पाहायला गेलं तर इतके कपडे असतात की कपड्यांना अक्षरश: कपाट पुरत नाही. अशावेळी सगळेच कपडे कसेही ठेवावे लगतात. त्यात सकाळी बाहेर जायची गडबड असेल तर नेमका गोंधळ हा होणारच. पण आता याचं टेन्शन घेऊ नका कारण आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट जुगाड घेऊन आलो आहोत. कारण खूप जणांना घरी कोणी आले की कपाट उघडावे असे अजिबात वाटत नाही.त्यांच्यासाठी हा विषय खूप मदत करणारा असणार आहे. एका छोट्याश्या बॉटलमध्ये तुमची कपडे बसतील. हा जुगाड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.
एका बॉटलमध्ये हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये गृहीणीने दाखवल्याप्रमाणे एक मोठी बॉटल घ्या, बॉटलच्या वरचा भाग म्हणजेच झाकणाकडचा भाग कापून घ्या, आता संपूर्ण बॉटलच्या गोल गोल रिंग झाल्या पाहिजेत अशाप्रकारे कापून घ्या, गोल रिंग कापून झाल्यावर आता आपल्याला एक कपडे सुकवतो तो हँगर लागेल. हा हँगर उघडा आणि त्यात या प्लॅस्टिक बाटलीच्या कापलेल्या रिंग टाका. आता हँगरमध्ये टाकलेल्या या रिंगमध्ये तुमचे एकेएक कपडे ठेवा. यामध्ये तुमच्या साड्यांपासून ड्रेस, जीन्स सगळे ठेऊ शकता. अशाच पद्धतीने एकाच हँगरमध्ये अनेक कपडे तुम्ही अगदी नीटपणे ठेवू शकता. हा व्हिडीओच पाहा ना तुम्हाला अगदी नीट कळेल…
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
@creatorsearch2.029 युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.