केस विंचरण्यासाठी कंगवा हे महत्वाचे साधन आहे. कंगवा ही आपल्या आयुष्यात लागणारी सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. केस विंचरण्यासाठी, केसांचे आरोग्य राखण्यासाठी, केसांतील गुंता सोडवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण रोज कंगव्याचा वापर करत असतो. पूर्वीच्या काळी केस विंचरण्यासाठी लाकडी कंगव्याचा वापर केला जात असे. परंतु बदलत्या काळानुसार, या लाकडी कंगव्याची जागा सध्याच्या प्लास्टिक कंगव्यानी घेतली. पण तुम्ही कधी तुमच्या घरातील कंगवा गरम तव्यावर ठेवले आहात का? जर हा प्रयोग तुम्ही केला नसेल तर नक्कीच करुन बघा. कारण प्रयोग नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कंगवा आणि तव्याचा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहिणींकडे बरेच घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी याचे व्हिडीओ करून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. दरम्यान असाच एक जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी गरम तव्यावर कंगवा ठेवला नाही ना.. मग एकदा गरम तव्यावर कंगवा ठेवून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर मात करेल. गरम तव्यावर कंगवा ठेवल्यानंतर कंगव्यामध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : Jugaad Video: महिलांनो, दागिने टोमॅटोत ठेवून पाहा; परिणाम पाहाल तर थक्क व्हाल )

नेमकं काय करायचं? 

कंगव्याची धार टोकदार असते. त्यामुळे लहान मुलांना केस विंचारळताना त्याचा त्रास होतो. कंगवे टोकदार असतात. डोक्यावरचा नाजूक त्वचेचा थर हे कंगवे हळूहळू काढून टाकतात. त्यामुळे केस तुटतात, केसांना फाटेही फुटतात. कंगव्याचे दात अतीच टोकदार असतील तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की महिलेने दाखविल्यानुसार, थोडा गरम तवा करुन तव्याला उलटा करुन कंगव्याचे टोक पूर्णपणे तव्यावर फिरवून घ्या. कंगव्याचे टोक थोड थोड गरम तव्यावर फिरवून घ्या त्यामुळे तुमच्या डोक्याला कंगव्याचे टोक रुतणार नाही, असे महिलेने व्हिडिओ शेअर करत सांगितले आहे. त्यामुळे नवीन कंगवा वापरताना सर्वात आधी अशाप्रकारे काम करा, असे महिलेने सांगितले.

पाहा व्हिडीओ

Avika Rawat Foods या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)