How To Save Electricity Bill Through Fridge: पावसाळा सुरू झाला आहे. परंतु, अनेकांचे लाइट बिल कमी झाले नाही. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसाप्रमाणेच वीज बिल येत आहे. तुम्हाला जर वीज बचत करायची असेल तर तुम्ही काही गोष्टीत बदल करू शकतात. तुम्हाला दर महिन्यातील विजेचे बिल कमी येईल.एका गृहिणीने या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो व्हायरल होतो आहे. जर तुम्हाला दर महिन्याला विजेचे बिल भरमसाठ येत असेल तर तुम्ही या ठिकाणी दिलेल्या काही ट्रिक्सचा वापर करून वीज बिल कमी करू शकता. जाणून घ्या डिटेल्स.
बटाट्याचा असा वापर तुम्हाला माहितीच नसेल
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. आतापर्यंत तुम्ही बटाट्यापासून बरेच पदार्थ बनवले असतील. बटाट्याचा घरगुती सौंदर्य उपाय म्हणूनही वापर केला असेल. पण हाच बटाटा तुमचं लाइट बिल कमी करू शकतो, याचा तुम्ही कधी विचारही केला होता का? किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
बटाटा एका विशिष्ट पद्धतीने वापरल्यास तुमचं लाइट बिल कमी होईल, ते कसं हे जाणून घेऊयात. तर यासाठी तुम्हाला फक्त बटाटे लागणार आहेत. या बटाट्याचं करायचं काय तर…सर्वात आधी बटाटा कापून घ्या त्यानंतर तो फ्रिजरमध्ये चोळून घ्या. यामुळे एरवी फ्रिजमध्ये साचत असलेला बर्फ साचणार नाही. दोन दिवसातून एकदा हा उपाय करा, असा सल्ला या महिलेने दिला आहे. यामुळे वीज बिल कमी होतं, असा दावा या महिलेने व्हिडीओत केला आहे. असं केल्यानं फ्रिजमध्ये बर्फ साठणार नाही, आणि विजेचे बिलही कमी येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: पायपुसण्यावर फक्त एकदा ‘ही’ वस्तू फिरवा; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी अगदी एकही रुपया खर्च न करता करून पाहू शकता. यामुळे फ्रीजमध्ये तयार होणारे बर्फाचे डोंगर तयार होणार नाहीत आणि यामुळे तुमच्या फ्रीजमुळे विजेच्या बिलामध्ये होणारी भरमसाठी वाढही कमी होईल. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.