आजपर्यंत तुम्ही शॅम्पूचा वापर केस धुण्यासाठी केला असेल. पण हाच शॅम्पू किचनमध्ये गॅससाठीही फायद्याचा ठरू शकतो याचा तुम्ही कधी विचार तरी केला होता का? हो गॅसवर शॅम्पू टाकल्याने काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय
गॅस चालू करण्याआधी त्यावर शॅम्पू टाका
आपण सकाळी उठल्यापासून गॅसवर चहा, नाश्ता, स्वयंपाक असं सतत काही ना काही करत असतो. स्वयंपाक करताना काही गोष्टी गॅसवर सांडतात आणि गॅसची शेगडी खराब होते. यातही दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक गॅस चालू करण्याआधी त्यावर शॅम्पू टाका आणि कमाल पाहा.
नेमकं काय करायचं?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. १५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा. व्हिनेगर आणि सोड्यामुळे गॅस शेगडी एकदम चकाचक दिसेल. आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा शॅम्पू वापरन पाहा..
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> नवरात्रीत नऊ दिवसांच्या उपवासात सारखी भूक लागतेय? मग अशाप्रकारे करा भूकेवर कंट्रोल, जाणून घ्या सविस्तर
@ LaxmiMajagahe यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)