Jugaad Video: आपल्यापैकी अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. आपण सोन्याचे दागिने घरातील कपाट लाॅकरमध्ये ठेवतो. सहसा चोरी होण्याच्या भीतीने अनेकजण दागिने बँकेतील लॉकरमध्ये ठेवतात. तुम्हीही बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू ठेवल्या असतील. पण तुम्ही कधी टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवले आहेत का, नाही ना, तुम्हीही हे वाचून चकित झालेच असेल. टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिणे ठेवले तर काय होईल, हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवल्याने काय फायदा होईल, असा जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. चला तर जाणून घेऊया…

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान असाच एक आश्चर्यचकीत करणारा अनोखा जुगाड व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवले आहे का? नाही ना.. मग एकदा ठेवून बघा. हा जुगाड तुमच्या समस्यांवर मात करेल. टोमॅटोमध्ये सोन्याचे दागिने ठेवल्यानंतर सोन्यामध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

सोनं हा अत्यंत चमकणारा धातू असला तरी सोन्याचे दागिने मात्र सतत अंगावर घातल्याने तसंच त्यातील नक्षीकामामध्ये घाण साचल्याने काही वेळेस त्याची चमक कमी होते. यासाठीच दागिने स्वच्छ करणं गरजेचं आहे. सोन्याचे दागिने देखील तुम्ही घरच्या घरी स्वच्छ करू शकता. जेणे करून ते पुन्हा चमकतील. यावरच महिलेने व्हिडिओ शेअर करत हटके जुगाड दाखविला आहे. काय दाखवलं आहे, जाणून घ्या…

(हे ही वाचा : Kitchen Jugaad Video: किचन सिंकमध्ये अर्धा वाटी दूध टाका; १० मिनिटांनी परिणाम पाहून थक्क व्हाल! )

व्हिडीओत दाखविल्यानुसार, गृहिणीने टोमॅटोचे दोन भाग केले आहे आणि एका भागाला सोन्याचे दागिने अडकवले आहे. त्यानंतर त्यावर कापलेल्या टोमॅटोचा दुसरा भाग ठेवला आणि रबरच्या मदतीने तुम्ही त्याला ५ ते १० मिनिटे जोडून ठेवू शकता, असे सांगितले. थोड्या वेळाने टोमॅटोच्या एका भागाला लावलेले सोन्याचे दागिने दुसऱ्या भागाने घासून काढा. यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन हे दागिने स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या. त्यामुळे तुमचे सोन्याचे दागिने पुन्हा नव्या सारखे चमकतील, हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहा, असे व्हिडिओ शेअर करत महिलेने सांगितले आहे. दागिने स्वच्छ करण्याचा हा एक सोपा घरगुती उपाय महिलेने शेअर केला आहे.

येथे पाहा व्हिडीओ

All in Ranjeeta या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)

Story img Loader