Kitchen jugad: स्वयंपाकघरातील साहित्य, शिजवलेले अन्न सुस्थितीत ठेवण्यात फ्रिज मोलाचे कार्य करतो. पण तुम्ही फ्रिजमध्ये पैसे ठेवले आहेत का? नाही ना मग आता एकदा बँक किंवा कपाट, पाकिट, गल्ला ही पैसे ठेवण्याची जागा. पण याशिवाय फ्रिजमध्येही एकदा पैसे ठेवून पाहा. फ्रिजमध्ये पैस ठेवण्याचा एक फायदा आहे. एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. फ्रिजमध्ये इतर सामानांसोबत पैसेही ठेवा. आता याचा काय फायदा होतो ते आपण व्हिडीओमध्ये पाहुयात.

फ्रिजमध्ये एकदा नक्की नाणं ठेवा

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral video of a man fell into boiled water shocking video on social media
VIDEO: उकळत्या पाण्याच्या टोपात पडला अन्…, माणसाबरोबर पुढे जे घडलं ते पाहून काळजाचा चुकेल ठोका
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

फ्रिजमध्ये पैसे ठेवण्याचं कदाचीत तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असेल, मात्र याचा फायदा बघून अवाक् व्हाल. याचा फायदा पाहून तुम्हीही यापुढे फ्रिजमध्ये पैसे नक्की ठेवाल. विशेषत: घराबाहेर जाताना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. चला पाहुयात नक्की काय आहे हा जुगाड.

फायदा बघून अवाक् व्हाल

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फ्रीजरमध्ये एका वाटीत पाणी भरून ठेवायचं आहे. त्यानंतर पाण्याचा बर्फ जमवून घ्यायचा आहे. यात पैशांची नाणी ठेवायची आहेत. आता या नाण्याचा उपयोग काय? तर जेव्हा तुम्ही कुठे बाहेर जाता त्यावेळी लाइट गेली की फ्रीजमधील वस्तू खराब होण्याचा धोका असतो. तुम्ही घरी येईपर्यंत कदाचित लाइट आलेली असते. लाइट गेली होती ते तुम्हाला समजत नाही. सर्व पदार्थ फ्रीजच्या तापमानाला आलेले असतात. त्यामुळे खराब होऊनही ते समजत नाही.

याचा तुम्हाला असा फायदा होईल की, तुम्ही बाहेरून घरी आल्यावर फ्रीज मधील वाटीतील नाणं पाहा. वाटीतील पाणी वितळून नाणं खाली गेलं असेल तर याचा अर्थ लाइट गेली होती. यानंतर फ्रिजमधले कोणते पदार्थ खराब झाले नाहीत ना हे चेक करून घ्या.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Fridge And Wall: फ्रिज अन् भिंतीमध्ये किती अंतर असावं? तुमच्या एका चुकीमुळे येतं भरमसाठ वीज बिल

आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Story img Loader