Kitchen Jugaad Video: गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. रबरचा वापर केस बांधण्यासाठी किंवा एखादी वस्तू, प्लॅस्टिक पिशवी पॅक करण्यासाठी करतो. पण याशिवायही रबरचा एक असा अनोखा वापर जो तुम्हाला माहितीच नसेल. एका गृहिणीने रबरचा जबरदस्त असा उपयोग करून दाखवला आहे. किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी तुम्हाला लागणार आहे रबर आणि फाॅइल पेपर गुंडाळतात तो रोल बॉक्स किंवा तुम्ही जुन्या झाडूचा दांड्याही वापरू शकता. या रोल किंवा दांड्यात रबर टाकून घ्या. आता याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.

हा रबर घातलेला रोल तुम्हाला दरवाजावरील पायपुसणीवर फिरवायचा आहे. यामुळे पायपुसणी स्वच्छ होईल. त्यात अडकलेली माती, केस या रबरला चिकटून येतील. कसे ते महिलेने या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. एरवी तुम्ही पायपुसणीमधून केस काढायला जाल तर ते निघत नाहीत. पण या जुगाडान सहज निघालेले पाहाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: फ्रिजला फक्त एकदा लावा हार्पिक, पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल लाइट बिल

या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. Sangeeta tyagi vlogs युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen tips in marathi rubber use for home cleaning tips hacks video viral srk
Show comments