Kitchen Jugaad Video: आपण सगळेच पैसे बचत करण्यासाठी काही ना काही करत असतो. पण पैसे बचतीचा आणखी एक सोपा असा मार्ग. किचन सिंकमध्ये कात्री टाकून तुम्ही पैशाची बचत करू शकता. आता किचन सिंक, कात्री आणि पैसा यांचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल. पण एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा किचन सिंक आणि कात्रीचा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. किचन सिंकमध्ये आपण काही ना काही टाकत असतो. विशेषतः तेलकट पाणी वगैरे. यामुळे सिंक चिकट, अस्वच्छ होतं. त्यावर डागही पडतात. सिंक स्वच्छ करण्यासाठी तुम्ही साबण किंवा डिटर्जंट किंवा एखादं लिक्विड वापरत असाल. पण ते वापरूनही किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते सहजासहजी स्वच्छ होत नाही. पण हा जुगाड ट्राय करुन फक्त किचन सिंकमध्ये कात्री टाकून तुम्ही काही मिनिटांतच आणि फार मेहनत न घेता सिंक साफ चकाचक होईल.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?

या जबरदस्त किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

आता कात्रीचा वापर करून किचन सिंक कसे चकाचक करायचे ते पाहुयात

यासाठी तुम्हाला फक्त एक छोट्या कात्रीची गरज आहे.व्हिडीओत गृहिणीने दाखवल्यानुसार तिने एक कात्री घेतली आहे आणि ती सिंकमधील जाळीत टाकली आहे. जाळीतील प्रत्येक छेदात कात्री टाकून ती जाळीत अडकलेली घाण कात्रीत अडकवून बाहेर काढत आहे. तुम्हाला हा उपाय क्षुल्लक वाटेल, याचा पैसे बचतीशी कसा काय संबंध असू शकतो, असा विचार तुम्ही कराल.

गृहिणीने याच व्हिडीओत याचं स्पष्टीकरण दिलं आहे. कितीही उपाय केले तरी किचन सिंकमध्ये कचरा अडकतोच. तसं किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी ड्रेन क्लिनर पावडर मिळतं. पण ते काही आपण दररोज वापरत नाही. महिन्यातून एकदाच वापरतो. शिवाय ते खूप महागही असतं. त्यामुळे तिथं पैसा खर्च होतो. पण जर तुम्ही यापद्धतीने किचन सिंक स्वच्छ केलं तर तुम्हाला ड्रेन क्लिनरची जास्त गरज पडणार नाही आणि पैशांचीही बचत होईल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: झोपण्याआधी सिलेंडरवर ठेवा फक्त एक वाटी; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

तुम्ही अशा पद्धतीने एकदा सिंक स्वच्छ करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Story img Loader