How to Clean Your Mattress at Home: बसणं, झोपणं, आराम करणं, यापैकी काही करायचं नसेल तरी बेड हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. पण तुम्हाला कल्पनाही नसेल यासंबंधी लहान लहान चुका माोठ्या आजारांचे कारण ठरू शकतात. जर तुम्ही बेड किंवा बेडशीट व्यवस्थित साफ करत नसाल तर व्हायरस, बॅक्टेरियांचे संक्रमण होण्याची शक्यता असते.अनेकदा बेडवरच स्नॅक्स खाणं, पाळीव प्राण्यांना झोपवणं, बाहेरून आल्यानंतर पाय न धुता बेडवर चढणं, घाम आलेल्या बेडवर झोपणं, त्यामुळे अनेक जर्म्स बेडवर पसरतात. त्यासाठी साफ-सफाई असणं गरजेंच आहे. आज आम्ही तुम्हाला बेडवर स्वच्छता कशी ठेवायची याबाबात सांगणार आहोत. यासाठी आम्ही जबरदस्त असा किचन जुगाड तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
बेडवर चहाची गाळणी फिरवा
चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. याशिवाय या गाळणीचा दुसरा काही वापर करत नाही. पण हीच चहाची गाळणी तुम्हाला आणखी एका कामासाठी उपयोगी पडेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण चहाची गाळणी तुम्ही झोपण्याआधी बेडवर फिरवायला हवी. एका गृहिणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये तिने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.
या पद्धतीनं बेड एकदम नव्यासारखा होईल
या व्हिडीओमध्ये गृहिणीनं अत्यंत सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थितपणे हा जुगाड दाखवला आहे. तुम्हीही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, सर्वात आधी तुम्हाला दोन गोष्टी घ्यायच्या आहेत एक गाळणी आणि दुसरी बेकिंग सोडा. गाळणीत बेकिंग सोडा घेऊन तो गादीवर चाळून पसरवून घ्यायचा आहे. १० मिनिटं तो गादीवर तसाच ठेवायचा आहे.त्यानंतर आपल्याला एक प्लेट आणि कपडा. आता तुम्हाला एक प्लेट घेऊन ती एका कपड्यावर उलटी ठेवा. कपड्याची चारही टोकं एकत्र करून त्याला रबर बांधा. ही प्लेट तुम्हाला इस्त्री सारखी गादीवर फिरवायची आहे. यामुळे गादीवरील बेकिंग सोडा स्वच्छ होईल. यानंतर याच कपड्यावर थोडं पाणी शिंपडून पुन्हा त्याच पद्धतीने गादीवर फिरवा. यावेळी पंखा चालू ठेवा. जेणेकरून गादी सुकेल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – किचन ट्रॉली खूप घाण होऊन गंजली आहे? मग साफ करण्यासाठी वापरा ‘या’ ४ सोप्या ट्रिक्स
आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)