Kitchen Jugaad Video: रोजचा स्वयंपाक करायचा म्हणजे आपल्याला किचनमध्ये कापणे, चिरणे, सोलणे, किसणे अशा अनेक कृती कराव्या लागतात. गृहिणी रोजच्या कामात या सगळ्या कृती आवर्जून करतातच. अशी किचनमधील छोटी-मोठी कामे करण्यासाठी किचनमध्ये किसणीचा वापर केला जातो. स्वयंपाक करायचा म्हटलं की, आपल्याला त्यात वेगवेगळ्या गोष्टी या किसून घ्याव्या लागतात. वाटण करण्यासाठी सुक-ओलं खोबर किसावे लागते. पण तुम्ही कधी किसणीवर बल्ब घासून पाहिलं आहे का, बहुतेक गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. काही गृहिणी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका व्हिडीओपैकी हा एक व्हिडीओ आहे. ज्यात किसणीचा अनोख्या कामासाठी वापर करून दाखवण्यात आला आहे.
गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी किसणीवर बल्बला घासून पाहिलं आहे का? नाही ना.. मग एकदा किसणीवर बल्ब घासून बघा. हा जुगाड तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. किसणी आणि बल्बचा हा अनोखा जुगाड पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय करायचं?
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर गृहिणीने, एक किसणी घेऊन बल्बची मागील बाजू म्हणजे होल्डरमध्ये टाकतो ती बाजू किसणीवर हलक्या हाताने घासताना दिसत आहे. यामुळे काय फायदा होणार तर, बरेचदा आपल्या घरातील एलईडी बल्ब पेटत नाही. खराब होतात. त्यामुळे हा उपाय केल्यास बल्ब खराब होणार नाही आणि चांगला प्रकाश घरभर होईल, असा दावा महिलेने केला आहे.
येथे पाहा व्हिडिओ
Indian Vlogger Pinki या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करत नाही.)