Kitchen Jugaad Video: आतापर्यंत तुम्ही बांगडी हातात घातली असेल पण कधी या बांगडीचा वापर तुम्ही तांदळात करून पाहिला आहे. तांदळात बांगडी टाकण्याचा मोठा फायदा आहे. तांदळात फक्त एक बांगडी टाका आणि अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.

गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय. या गृहिणीने तांदळात बांगडी टाकली आणि कमालच झाली. या बांगडीने काय चमत्कार केला ते तुम्हीच पाहा. किचन जुगाडा चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

या बांगडीने काय कमाल केली पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिलेने सांगितल्यानुसार एका भांड्यात तांदूळ घेऊन त्यात पाणी टाका. यात एक बांगडी टाका. दुसरं भांडं घ्या. त्यानंतर तांदळाचं भांडं हलवून घ्या. बांगडी तांदळाच्या आत तळाशी जाईल. तांदूळ वर येतील. आता हातावर हळूहळू थोडे तांदूळ आणि पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या. अशी प्रक्रिया हळूहळू शेवटपर्यंत करत राहा. आता शेवटी जे तांदूळ उरतील त्यात तुम्हाला दगड दिसतील. सर्व दगड भांड्याच्या तळाशी राहतात. बऱ्यादा तांदळात असे दगड असतात. त्यामुळे तांदूळ निवडावे लागतात. तरी एखाद दुसरा दगड तांदळात राहतो आणि मग भात खाताना तो तोंडात येतो.

पण या पद्धतीने तांदळात एकही दगड राहणार नाही. शिवाय तांदळातील प्रत्येक दगड काढणं सोपं होईल. जिथं तांदूळ निवडून दगड काढायला वेळ जातो, तिथं या ट्रिकने काही वेळातच तांदळातील दगड काढता येतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen jugad video: गृहिणींनो दुधाच्या भांड्यात फक्त एक चमचा रोज न चुकता ठेवा, कायमचं टेन्शन जाईल

@VardanPakwan युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

Story img Loader