Kitchen Tips: जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवा किचन जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला दुधात बटाटे टाकायचे आहे. आता तुम्ही म्हणाल काय दुधात बटाटे टाकून काय होणारे. दूध उकळताना तुम्हाला बटाट्याचा वापर करायचा आहे. दुधाच्या भांड्यात बटाटा टाकल्यानंतर अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.
दूध उकळताना उतू जाऊ नये याची काळजी घेणे हे त्यातलंच एक.. अशी लहान मोठी आव्हानं पुर्ण करत गृहिणी रोजचा स्वयंपाक करतात. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या ६ ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे दूध ओतू जाऊन गॅस, ओटा खराब होण्याचं टेन्शन दूर होणार आहे. आता दूध तापत आलंय, एका मिनिटात गॅस बंद करायचाय अशी आपल्या मेंदूने नोंद पण घेतलेली असते. पण तितक्यात काहीतरी कारणाने क्षणभरासाठी आपण वळतो आणि भसाभस दूध ऊतू जातं…
काय ओळखीचा वाटतोय ना हा प्रसंग? घराघरात नेहमीच घडणारी ही गोष्ट, घरातल्या गृहिणींना मात्र त्रस्त करते. परंतु असे होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दूध ऊतू जाण्यापासून वाचवू शकाल. चला तर मग जाणून घेऊया एक सोपी ट्रिक…याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालंय.
तुम्हाला फक्त दुधाच्या भांड्याला बाजूनं बटाटा कापून लावायचा आहे. बटाटा कापल्यानंतर बटाट्यामधून जे द्रव बाहेर येत ते दुधाच्या भांड्याला गोल लावून घ्यायचं आहे. यामुळे तुमचं दूध यापुढे कधीही उतू जाणार नाही .
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> नैसर्गिकरित्या गुलाबी गाल कसे मिळवायचे? घरच्या घरी फळांपासून बनवा ब्लशर पावडर
बटाट्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. @AvikaRawatFoods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही सुद्धा हा जुगाड घरच्या घरी करून पाहू शकता. तुमहीही ही ट्रिक वापरा आणि याचा तुम्हाला फायदा होतो का हे आम्हाला नक्की कळवा.