Kitchen Jugaad: आतापर्यं तुम्ही तुमचे दागिने कपाटात, पेटीमध्ये लॉकरमध्ये ठेवले असतील, किंवा इतर लोकही हेच करतात हे एकल असेलच. मात्र, तुम्ही कधी दागिने लॉकरऐवजी चपातीच्या पिठात ठेवले आहेत का? तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटलं असेल पण अशा एक जबरदस्त किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. चपातीच्या पिठात दागिने ठेवण्याचा मोठा फायदा आहे. याचा असा परिणाम की तुम्ही पाहूनच थक्क व्हाल.
घरात चोरी आणि दरोड्याच्या भीतीने लोक बॅंकांच्या लॉकरमध्ये पैसा अडका दागिने ठेवणे सुरक्षित मानत असतात. घराच्या तुलनेत बॅंकचे लॉकर सुरक्षित मानले जात असतात. त्यामुळे जास्त रक्कम असेल, दागिने वा महत्वाची कागद पत्रे ग्राहक बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देत असतात. बॅंकेचे लॉकर ग्राहकांना सुरक्षित वाटत असते. मात्र अजूनही अशी लोकं आहेत जी घरातच दागिने ठेवतात. त्यामुळे त्यांना नेहमी या दागिण्यांची चिंता असते, घराबाहेर पडताना मागे घरात दागिने असेच ठेवून जाणंही सुरक्षित नसतं. मात्र एका गृहिणीने यावर हटके उपाय शोधलाय.
आता तुम्ही म्हणाल एवढे मौल्यवान दागिने पिठाच्या डब्यात कोण ठेवत. पण हा जुगाड पाहून तुम्हीही आता घराबाहेर जाताना हेच कराल. तसेच दागीणे स्वच्छ करण्याचंही तुमचं टेन्शन कायमचं जाईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,एका भांड्यात थोडं गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात सोन्याचे दागिने टाकले आहेत. पीठ पूर्ण त्या दागिन्यांमध्ये बसतं. त्यानंतर महिला एक टूथपिक घेते आणि त्याने दागिन्यांमध्ये अडकलेलं पीठ काढते. आता याचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्ही पाहिलं असेल दागिने वापरून वापरून त्यातील काही कोपरे काळे पडलेले दिसतात. त्यात मळ, घाण साचते. साधा कपडा किंवा नुसत्या पाण्याने धुवून ही मळ निघत नाही. पण या पद्धतीने ती सहज निघेल असं ही गृहीणी सांगत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Kitchen Jugaad: दुधात बटाटा टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
@Kiranssmarttipsandtricksयुट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात ज्याची मदत आपल्याला होऊ शकते, फक्त त्याचा योग्य उपयोग आपल्याला माहिती नसतो. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का हे आम्हाला कमेंट करु कळवा.
(सूचना – या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. लोकसत्ताचा याच्याशी संबंध नाही. लोकसत्ता याची हमी देत नाही.)