उन्हाळ्यामध्ये कच्चा कांदा भरपूर प्रमाणात खातातते. कांदा फक्त शरीराला थंडवा देत नाही पण त्यात कित्येक अँन्टी ऑक्सिडेंट्स आणि इंफ्लेमेंटरी गुणधर्म असतात. कांद्याचे फायदे सर्वांनाच माहित आहेत. कांद्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो मग ग्रेव्ही असो किंवा सॅलडसाठी. कांद्याशिवाय कित्येक पदार्थ तयार करता येत नाही. पण कांदा कापणे मात्र सर्वात अवघड काम आहे. अनेकांना कांदा कापयला आवडत नाही कारण कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. तज्ज्ञांच्या मते, कांद्यामध्ये सायन-प्रोपॅनिथियल-एस-ऑक्साइड नावाचं एत रसायन आढळतं. हे रसायन डोळ्यातून अश्रू येण्यास एक रसायन कारणीभूत आहे. कांदा कापल्यानंतर त्यामध्ये असलेले लॅक्राइमॅटरी-फॅक्टर सिंथेस एन्झाइम बाहेर पडतं, जे डोळ्यांच्या संपर्कात येताच अश्रू ग्रंथीवर परिणाम होऊ लागतो आणि डोळ्यातून पाणी येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून आपण कित्येक ट्रिक वापरतो. कोणी कांद्याची साल डोक्यावर ठेवते तर कोणी कांद्याची साल काढून पाण्यात ठेवण्यास सांगतात मग बारीक-मोठा हवा तसा कापण्याचा सल्ला देतात. कांदा तिखट असेल तोपर्यंत डोळ्याची प्रचंड आग होते. अशीच एक भन्नाट ट्रिक जाणून घेऊ या.

हेही वाचा – Kitchen Jugaad: गॅसवर लिंबू टाकताच होईल कमाल, पाहा भन्नाट किचन जुगाड व्हिडीओ

कांदा कापण्यााआधी कोमट पाण्यात ठेवा

कांदा कापण्याआधी तुम्हाला तो गरम पाण्यात ठेवायचा आहे. एक कढई घ्या. त्यात कांदा बुडेल इतके पाणी घ्या. पाणी कोमट होऊ द्या. आता त्या आखा कांदा, साल न काढता ठेवा. गॅस बंद करा. कांदा बाहेर काढा आणि नेहमीप्रमाणे साल काढून कांदा कापा. कोमट पाण्यात कांदा ठेवल्याने कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून एक थेंबही पाणी येणार नाही असा दावा युट्यूब व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. ही सोपी ट्रिक Delicious Food नावाच्या युट्यूब व्हिडीओमध्ये दाखवली आहे. तुम्ही स्वत: ही ट्रिक वापरून पाहू शकता. आता झटपट कांदा कापा आणि तुम्हाला हवा तो पदार्थ बनवा.

हेही वाचा –Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”

कांदा कापल्यानंतर पाण्यात का ठेवतात?

कित्येक लोक कांद्याच्या तिखटपणामुळे तो खात नाही. कांदा चवीला तिखट असतो आणि कांदा खाल्यानंतर बराच वेळ तोंडाला त्याचा वास येतो .फक्त इतके करायचे आहे की कांदा ताटात वाढण्यापूर्वी एक वाटी पाण्यात चांगला भिजू द्या. यामुळे कांद्यांचा तिखटपणा कमी होतो. कांद्याच्या तिखटपणामागे सल्फर संयुगे कारणीभूत असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen tips keep the onion in in hot water before chopping it not no tears will come from your eyes snk