Cooking Tips: असे खूप कमी जण आहेत, ज्यांना स्वतःच्या हाताने जेवण बनवायला आवडतं. परंतु, वेळेअभावी त्यांना विविध पदार्थ तयार करता येत नाहीत. शिवाय अनेकदा घाईगडबडीमध्ये जेवण बनवताना काहीतरी चुकतं. अशावेळी तुम्ही किचन टिप्सच्या मदतीने झटपट आवडीचे पदार्थ बनवू शकता. आज तुम्हाला जेवण बनवतानाच्या अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
‘या’ कुकिंग टिप्स करा फॉलो
मिक्सरची पातं धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राईण्ड करावं, यामुळे ते धारदार राहतील.
मिरचीचा खरडा काळा पडू नये म्हणून खरडा करतानाच त्यात थोडे लिंबू पिळा, त्यामुळे रंग हिरवागारच राहील.
कांदे आणि बटाटे कधीही एकत्र साठवू नये, नाहीतर बटाटे जास्त काळ चांगले राहत नाहीत.
पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत दोन चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात.
कोफ्ता बनवण्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते कुरकुरीत होतात, शिवाय ते कमी तेल शोषून घेतात.
लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्ड्याला गोड्या तेलाचा हात लावल्यास मदत होते.
खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे.
किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेल लावल्यास गूळ चिटकत नाही.
पुरणपोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळीबाहेर येत नाही.
लाडू करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
कांदा भाजताना त्यात किंचित मीठ घाला, त्यामुळे कांदा लगेच भाजण्यास मदत होते.
कापलेले सफरचंद लाल होण्यापासून वाचण्यासाठी त्याला थोडा लिंबाचा रस लावावा.