House cleaning ideas: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आपल्याला सर्वत्र अत्याधुनिक व गरजेच्या वस्तू पाहायला मिळतात. आजकाल जवळपास प्रत्येक घरात मिक्सर ग्राइंडरचा वापर अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. बदलत्या काळानुसार स्वयंपाकघरात काम करण्याची पद्धतही खूप बदलली आहे. पूर्वीच्या काळी मसाला किंवा स्वयंपाक घरातील इतर पदार्थ वाटण्यासाठी पाटकणाचा वापर केला जायचा परंतु, सध्या याची जागा मिक्सर ग्राइंडरने घेतली आहे. एवढेच नाही तर मिक्सर अचानक बिघडला तर सर्व काम सोडून ते दुरुस्त करण्यासाठी जावे लागते. काही वेळा अगदी छोट्या चुकांमुळे मिक्सर ग्राइंडर खराब होतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याची नीट साफसफाई न करणे.
तुम्ही आतापर्यंत हार्पिकचा वापर बाथरूम-टॉयलेटची साफसफाई करण्यासाठी केला असेल. पण असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याचा वापर पोळीला केल्याचे पाहायला मिळत आहे. पण या व्हिडीओमागे नेमकं काय सत्य आहे ते जाणून घेऊया…
तुम्ही कधी पोळीला हार्पिक लावून पाहिलं आहे का? पोळीला हार्पिक वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मात्र याचा उपयोग करुन तुम्ही अगदी पाच मिनिटांत तुमचं मिक्सरचं भांडं सहज स्वच्छ करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असले पोळीला हार्पिक लावून कसं स्वच्छ होईल, तर एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पोळीला वर हार्पिक टाकल्यावर बघा काय झालं..
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता तव्यावर एक पोळी दिसते आहे. आपण सगळेच साधारण पोळीला तेल-तूप लावणं अपेक्षित आहे. पण या व्हिडीओत मात्र गृहिणीने या पोळीला तेल-तूप लावलं नाही. तर या पोळीला तिने हार्पिक लावलं. हार्पिक तिने या पोळीवर पसरवलं. यानंतर तिने ही पोळी तशीच उचलली आणि एका वाटीत ठेवली. या वाटीत थोडं पाणीही आहे. या पाण्यात तिने हार्पिक लावलेली पोळी भिजवली आणि ती मिक्स केली. चपाती, हार्पिक, पाणी यांचा तिने संपूर्ण लगदा केला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> गौरीच्या ओवस्याला घरच्या घरी बनवा केमिकल विरहित कुंकू; फक्त ५ मिनिटात होईल तयार…
अशाप्रकारे ही सोपी ट्रिक वापरून आपण मिक्सरच्या खालच्या भागातील कठीणातले कठीण हट्टी, चिकट, मेणचट डाग अतिशय सहजरित्या काढू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)