खाद्यपदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी सर्वच घरांमध्ये फ्रिज वापरला जातो. फ्रिजमुळे गृहिणींचे काम सोपे होते, एखाद्या दिवशी जेवण बनवण्याची घाई असेल तर त्याची तयारी अगोदरच्या दिवशी करून ठेवली जाते आणि ते सर्व फ्रिजमध्ये साठवून ठेवले जाते. तसेच रोजचे उरलेले अन्न देखील आपण फ्रिजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी खाऊ शकतो. अशाप्रकारे फ्रिजची खूप मदत होते. पण फ्रिजचा योग्यरित्या वापर कसा करायचा याबाबात अनेकांना माहिती नसते, त्यामुळे खाद्यपदार्थ खराब होऊ शकतात. यासाठी फ्रिजमधील खाद्यपदार्थ अधिक काळ टिकण्यासाठी तसेच फ्रिजचा योग्यरित्या वापर करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरम अन्नपदार्थ लगेच फ्रिजमध्ये ठेऊ नका
गरम अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यातील पोषकतत्त्व नष्ट होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे हे गरम पदार्थ थंड करण्यासाठी फ्रिजवर जास्त ताण पडतो. त्यामुळे गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याआधी रूम टेम्परेचरला थंड करा.

भाज्या आणि फळं वेगवेगळ्या ठिकाणी साठवा
फ्रिजमध्ये भाज्या आणि फळं एका ठिकाणी साठवल्यास ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे भाज्या आणि फळं वेगवेगळ्या ठिकाणी साठवा.

आणखी वाचा : वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ करतात मदत; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

फ्रिज नियमितपणे स्वच्छ करा
फ्रिज नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे, कारण यामुळे फ्रिजमध्ये खराब, फळांमुळे निर्माण होणारे बॅक्टेरिया, माक्रोब्स यांपासून सुटका मिळवण्यास मदत होते.

तापमान
फ्रिजमधील तापमानाचा खाद्यपदार्थांवर परिणाम होतो. त्यामुळे फ्रिजमधील तापमान योग्य असणे गरजेचे असते. फ्रिजरचे तापमान शून्य सेल्सिअस तर फ्रिजचे तापमान शून्य ते चार सेल्सिअस असावे. यापेक्षा कमी तापमान असल्यास खाद्यपदार्थ खराब होण्याची शक्यता असते.

फ्रिजवर खाद्यपदार्थ ठेऊ नका
अनेकदा ब्रेड किंवा सॉसची बॉटल अशा वस्तु फ्रिजवर ठेवल्या जातात, पण फ्रिजमधून बाहेर पडणाऱ्या गरम वाफांमुळे ते खाद्यपदार्थ खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजवर खाद्यपदार्थ ठेऊ नका.