Knife Sharpening : स्वयंपाकघरात सुरी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. भाजीपासून फळे कापण्याकरीता सूरीचा वापर आपण करतो. नियमित वापरामुळे अनेकदा स्वयंपाकघरातीला सूरीला धार नसते त्यामुळे भाजी कापताना त्रास होतो. सूरीची धार गेल्यानंतर काहीजण सूरी निकामी झाल्याचे समजतात आणि नवीन सूरी खरेदी करतात किंवा पैसे देऊन सूरीला धार लावून घेतात पण एक रुपयाही खर्च न करता तुम्ही घरच्या घरी सूरीला धार लावू शकता.
हेही वाचा : नवऱ्यांनो, ‘या’ चुकांमुळे तुम्ही कधीही चांगला नवरा होऊ शकत नाही! आजपासून सोडा या वाईट सवयी …
सूरीची धार गेल्यानंतरही काही लोकसुद्धा लक्ष देत नाही आणि त्याच सूरीने काम करतात पण काही घरगुती उपाय करुन तुम्ही सुरी-विळीची धार करू शकता. ते घरगुती उपाय कोणते आज आपण जाणून घेऊ या.
चिनी मातीचे कप
चिनी मातीचे कप घ्या आणि उलटे ठेवा. त्यावर सुरी घासा. चिनी मातीवर सूरीचे घर्षण केल्यामुळे धार येऊ शकते. हा एक चांगला घरगुती उपाय आहे. सुरी घासताना हाताला इजा होणार नाही, याची काळजी घ्या.
हेही वाचा : Joint Family : जॉइंट फॅमिलीमध्ये राहण्याचे तगडे फायदे; वाचाल तर कधीही एकटे राहणार नाही
लोखंडी सळई
प्रत्येकाच्या घरी लोखंडी सळई असतातच. या लोखंडी सळईच्या मदतीने तुम्ही सूरीची धार परत आणू शकता. यासाठी लोखंडी सळईला उन्हात गरम करायला ठेवा. यावर सुरी घासून तुम्ही धार टोकदार बनवू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)