सर्वत्र सुरु असलेला साथीचा आजार कोविड-१९ आपली पाठ सोडत नाही तोपर्यंतच तर आता देशात बर्ड फ्लू दाखल झाला आहे. अलीकडेच बर्ड फ्लूमुळे दिल्लीच्या एम्समध्ये एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यूही झाला आहे. यावर्षी देशात बर्ड फ्लूच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. बर्ड फ्लू ची भीती केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. पश्चिम आफ्रिकन देश टोगोमध्ये या आजाराच्या दहशतीमुळे सुमारे ८०० पक्षी मारले गेले आहेत. यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ल्यात १४ कावळ्यांचा मृत्यू झाला होता तर संजय तलावामध्ये चार बदके मेली होती. यानंतर त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले. मानवांमध्ये या विषाणूच्या प्रसारासंदर्भात तज्ञांचा असा विश्वास आहे की या विषाणूच्या बदलांमुळे मानवाला याची लागण होऊ शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आहेत लक्षणे

थंडी, सर्दी, खोकला,श्वास नीट न घेता येणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडीने ताप येणे अशी लक्षणे बर्ड फ्लूची आहेत. हा आजार सहसा आजारी पक्ष्याच्या संपर्कात आल्यामुळे होतो. या आजाराची लक्षणे दिसण्यासाठी सुमारे दोन ते आठ दिवस लागतात.

असे संरक्षण करा

पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांना बर्ड फ्लूचा सर्वाधिक धोका असतो. त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांनी सर्वात प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले पाहिजेत. संसर्ग टाळण्यासाठी पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्यांनी त्यांच्या तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे वापरावेत. याशिवाय हात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमी साबण किंवा सॅनिटायझर वापरावा. पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानंतर एकदा चांगली आंघोळ करावी. पोल्ट्री फार्ममध्ये वापरलेले कपडे पूर्णपणे स्वच्छ करा.

नवीन स्ट्रेन

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने १ जून रोजी चीनच्या पूर्व जिआंग्सु प्रांतात बर्ड फ्लूच्या एच १० एन ३ स्ट्रेनचा पहिला मानवी संसर्ग प्रकरण नोंदविला होता. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही घटना २८ मे रोजी एका ४१ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाला. एच १० एन ३ स्ट्रेन हा एच ५ एन ८ इन्फ्लूएन्झा-ए व्हायरसचा उपप्रकार आहे, याला बर्ड फ्लू देखील म्हणतात.