घराच्या बाल्कनीत सुंदर झाडे लावायला सर्वांनाच आवडत असेल. झाडांवर बहरलेली सुंदर फुले घराचंच सौंदर्य फुलवत नाहीत, तर आजूबाजूचं वातावरणही शुद्ध करतात. त्यामुळे अनेक लोक घराच्या बाल्कनीत किंवा होम गार्डनमध्ये सुंदर झाडे लावतात. लोक घरात असलेल्या कुंडीत झाडे लावतात पण त्या झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने ते सुकतात आणि उन्मळून पडतात. झाडांना हिरवंगार ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशही पाण्यासारखं काम करतं. अशातच आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही बाल्कनीत लावलेली झाडे सुकणार नाहीत. जाणून घेऊयात काही सोप्या टिप्स.
थोडा सूर्यप्रकाशही पुरेसा आहे
जर तुमच्या बाल्कनीत सूर्यप्रकाश येत नसेल किंवा पूर्णपणे बंद असेल. तर कधी कधी त्या झाडांना अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडंफार सूर्यप्रकाश येत असेल. तसंच या झाडांना नियमित पाणी देत राहा. परंतु, खूप जास्त पाणी देताना काळजी घ्या. कारण कुंडीत माती खूप जास्त ओली आणि मऊ असते. अशातच झाडांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर झाडे खराब होऊ शकतात.
आर्टिफिशियल लाईट
जर बाल्कनीत ठेवलेल्या झाडांना सूर्यप्रकाश मिळत नसेल आणि त्या ठिकाणी अंधार होत असेल. तर तुम्ही आर्टिफिशियल लाईटचा वापर करू शकता. आजूबाजूला असलेल्या नर्सरीत जाऊन तुम्ही यांसंबंधीत माहिती घेऊ शकता. झाडांना उष्णता मिळण्यासाठी लोक नेहमी बल्बच्या लाईटचा वापर करतात.
आरसा लावा
झाडांना सूर्यप्रकाश देण्यासाठी रिफ्लेक्टिव सर्फेसचा वापर करा. म्हणजेच तुम्ही त्या जागेवर आरसा लावू शकता. ज्यामुळे सूर्यप्रकास रिफ्लेक्ट होऊन झाडांवर पडेल.
कमी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असणारी झाडे लावा
जर तुमच्या बाल्कनीत अजिबातच सूर्यप्रकाश येत नसेल, तर अशा झाडांना लावा, ज्यांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता लागणार नाही. ड्रासिना, क्रोटोन, स्नेक प्लांट, फर्न्स, पीस लीली, चायनीज एव्हरग्रीन, रबर प्लांट अशा झाडांना जास्त सूर्यप्रकाशाची गरज लागत नाही. या झाडांना तुम्ही बाल्कनी, लिविंग रूम, बेडरूममध्ये सहजरित्या लावू शकता. हे अशे इनडोअर प्लांट्स आहेत ज्यांची तुम्ही सहज निगा राखू शकता.
शेणाचा लेप
झाडांसाठी शेणाचा लेप, चांगली माती आणि रेती सारख्या प्रमाणात मिक्स करून त्याच झाडे लावा. याशिवाय झाडांना पाणीही जास्त घालू नका. नाहीतर झाडे खराब होऊ शकतात. अशातच माती, योग्यवेळी पाणी आणि कधी कधी सूर्यप्रकाशात ठेवल्यावर झाडे खराब होत नाहीत. जर झाडांना सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर रोपांमध्ये सुके घास-पात टाका. यामुळे मातीत असलेला अतिरिक्त ओलावा कमी होतो. हिवाळ्यात डेली प्लांट्सला पाणी दिल्यावर ते खराब होऊ शकतात. त्यामुळे माती सुकल्यावर पाणी दिलं तर ते योग्य ठरेल.