Running Health Benefits : पिळदार शरीर आणि उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी धावण्याची अत्यंत गरज असते. पण धावतानाही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. धावताना वेग किती असावा, किती वेळ धावावे, तसंच आरोग्याच्या दृष्टीने चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी धावताना सावधानताही बाळगावी लागते. वेगाने धावल्याने शरीराला कोणते फायदे होतात? तसंच धीम्या गतीने धावून लांबचे अंतर गाठल्यास काय फायदे होतात? याबाबत डॉ.सुधीर कामत यांनी सल्ला दिला आहे. धावणे म्हणजे एक आदर्श आहे, असं कामत यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. कामत यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, लॉंग रन केल्यामुळं शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्य निरोगी राहण्याबरोबरच शरीर पिळदार राहतं. जोरात धावण्यापेक्षा हळू धावणे नेहमीच फायदेशीर ठरते. कमी वेगात धाऊन जास्त अंतर पार करणेही आरोग्यास फायदेशीर असते. डॉक्टरांनी धावण्याचा सल्ला दिल्यानंतर एका ट्वीटर युजरने त्याचा अनुभव शेअर करत ट्वीटला रिप्लाय केलं. राधाक्रिष्णन यांनी ट्वीटरवर रिप्लाय करून म्हटलं, “आज मी माझा पेस ७.०५ ते ७.४५ पर्यंत कमी केला. हर्ट रेटही १४३ पर्यंत झाला. धन्यवाद सर.”

नक्की वाचा – ओठाने तुटेल अशी मऊ भाकरी कधी खाल्ले का? ही सोपी रेसिपी पाहा अन् ताव मारून बघा

आरोग्यविषयक समस्यांबाबत डॉ. आर आर दत्ता यांनीही सल्लामसलत केली आहे. खूप जास्त व्यायाम केल्यावर काही लोकं व्यायाम करताना खाली पडतात. खूप मेहनत घेणे सर्वच गोष्टींसाठी फायदेशीर नसते. वेगानं धावल्यानेही शारीरिक फायदे होतात. पण ज्या लोकांना उच्च रक्तदाब आहे, त्यांनी वेगानं धावणे टाळावे. अशा व्यक्तींना जोरात धावल्याने शरीरिक समस्येला सामोरं जावं लागू शकतं. शरीर किती मजबूत आहे आणि किती कमकुवत आहे, हे तुम्हाला नेहमीच्या आरोग्य तपसणीत माहितंच होतं. तुम्हाला रक्त दाबाचा त्रास असेल, तर काळजीपूर्वक व्यायाम करा. तुम्ही जोरात धावण्याऐवदी चालू शकता. दररोज एक तास चालल्याने काही लोकांनी वजन कमी केल्याची अनेक उदाहरणं समोर आहेत. धावण्याचा वेगाची मर्यादा ठेवा. योग्य पद्धतीने व्यायाम कसा करावा, यासाठी नेहमीच आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वैज्ञानिकांच्या मते रोज केवळ सात मिनिटे हळूहळू धावण्याने आरोग्यास फायदा होतो. जे लोक धावण्याचा व्यायाम करीत नाहीत त्यांच्या तुलनेत तो व्यायाम करणाऱ्यांना हृदयविकार व पक्षाघातने मृत्यू येण्याची शक्यता कमी होते. धावण्याने मिळणारे हे फायदे तुम्ही किती दूर, किती सातत्याने धावता यावर अवलंबून नाहीत, लिंग, वय, बॉडी मास इंडेक्स, दारू पिणे व धूम्रपान करणे हे सर्व घटक धावण्याचे फायदे तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीत याचा अर्थ दारू व धूम्रपान केले तरी चालते असे नाही कारण त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about running health benefits running faster or longer which one is the best exercise know from experts nss
Show comments