Soaked Cashews Health Benefits : ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बदाम, किशमिश, पिस्ता, मूंगफली आणि काजू अशाप्रकारचे ड्रायफ्रूट्स सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. या ड्रायफ्रूट्समध्ये समावेश असलेल्या काजूत प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, जिंक, कॉपरसारखे मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. काजूत विटॅमिन K, विटॅमिन B6 आणि थायमिनही मोठ्या प्रमाणात असतात. काजूला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या आहारात समाविष्ट करु शकता. आतापर्यंत तुम्ही भिजलेले बदाम आणि आक्रोडच्या फायद्यांबद्दल ऐकलं असेल. पण भिजलेल्या काजूचे प्रचंड फायदे असतात, याबाबत तुम्हाला माहितेय का? दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. हे कब्जपासून सुटका करण्यातही मदत करतं. दूधात भिजवलेले काजू खाल्ल्याने अजूनही काही फायदे होतात. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

१) हाडांची मजबूती

milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Agricultural Commodity Markets Rice Exports Ethanol Producers
तांदूळ, साखर, मका; पुढे इथेनॉलचा धोका
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
police arrest five for killing 28 year old man in pimpri chinchwad
बायकोच्या अंगावर फेकलेल्या चिठ्ठीचा जाब विचारणाऱ्या पतीचा खून
sleep relation with health
Health Special: निवांत झोप आणि आरोग्याचं नातं
‘या’ वेळात शेंगदाणे खाल्ल्यास झपाट्याने होणार वजन कमी? सेवनाची ‘ही’ पद्धत फक्त एकदा समजून घ्या…

जर तुम्ही दुधात रात्रभर भिजवलेले काजू खाल्ले, तर तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होईल. दुधात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असतं. तर काजूमध्ये विटॅमिन K, विटॅमिन B6, मॅग्नेशियम आणि मँगनीजसारखे पोषक तत्व असतात. हे सर्व विटॅमिन्स आणि मिनरल्स हाडांना मजबूत करण्यासाठी मदत करतात. याशिवाय, गुडघे दुखीपासूनही दिलासा देतात. तसेच हाडांच्या वेदनांपासूनही तुम्हाला सुटका करायची असेल, तर दुधात भिजवलेले काजू नक्की खा.

नक्की वाचा – लघवीद्वारे अतिरिक्त ब्लड शुगर शरीराबाहेर काढून टाकतो ‘हा’ भात? तज्ज्ञ सांगतात, “डायबिटीज रुग्णांनी….”

कब्जच्या समेस्यापासून होणार सुटका?

आताच्या बदलत्या जीवनशैलीत कब्ज एक सामान्य समस्या बनली आहे. जर तुम्हाला कब्जची समस्या सतावत असेल, तर तुम्ही दुधात भिजवलेल्या काजूंच सेवन करणं सुरु करा. काजूत मोठ्या प्रमाणावर फायबर असतं. ज्यामुळे कब्जच्या समस्येवर मात करता येऊ शकते.
इम्यूनिटी वाढण्यास मदत होते दररोज दूधात भिजवलेले काजू खाल्ल्याने तुमची इम्यूनिटी वाढते. दूध आणि काजूमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असते. जर याचं एकत्रित सेवन केलं, तर तुमची इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. दुधात भिजवलेले काजू खाल्ल्याने तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

भिजवलेल्या काजूचं सेवन कसं कराल?

एका ग्लास दुधात ३ ते ५ काजू रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी उठून काजूला दूधात चांगल्या पद्धतीने उकळून घ्या. त्यानंतर भिजलेलं काजू खाऊन दूख पिऊन घ्या. काजूचं सेवन मोठ्या प्रमाणात करु नका. कारण खूप जास्त काजू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही. काजूमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता असते.