देशातील सगळ्यात मोठी वाहन निर्मिती कंपनी अशी ‘टाटा’ ची ओळख आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नॅनो कार टाटा मोटर्सने अवघ्या १ लाख रुपयात उपलब्ध करून दिली होती. याच टाटा कंपनीने निर्मिती केलेली एसयुव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली होती. आता टाटा कंपनीने या एसयुव्ही कारचं सगळ्यात स्वस्त मॉडेल बाजारात आणलं आहे. एसयुव्ही कारच्या या नव्या मॉडेलला ‘मायक्रो एसयुव्ही टाटा पंच’ असं नाव देण्यात आलं आहे. लोकांना एसयुव्हीच्या या नवीन मॉडेलची बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. टाटा कंपनीकडून या नवीन एसयुव्ही कार मॉडेलची संकल्पना ऑटो एक्स्पो दरम्यान सादर करण्यात आली होती.
एक्सटीरियर आणि डिसाईन :
मायक्रो एसयुव्ही पंच कार ही टाटा मोटर्सची ALFA-ARC (एजाइल लाइट फ्लेक्सिबल एडवांस्ड आर्किटेक्चर) वापरून तयार करण्यात आलेली पहिली एसयुव्ही कार आहे. या एसयुव्हीला इम्पॅक्ट २.० डिझाईन लँग्वेजद्वारे विकसित करण्यात आलं आहे. तरुणांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या एसयुव्हीला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे.
टाटा पंच कार स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासोबतच यात टाटा हॅरिअरचे वैशिष्ट्य असणारे डे टाइम रनिंग लाइट्स आणि लांब बोनट हे फीचर्सही देण्यात आले आहेत. या एसयुव्हीला आकर्षक असे अलॉय व्हील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एसयुव्ही पंच कार आकाराने छोटी असली तरीही कोणत्याही रस्त्यावर ही कार बिनदिक्कत चालवता येणार आहे.
इंटीरियर आणि फीचर्स:
टाटा पंच कारच्या इंटीरियरबाबत कंपनीकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु अंदाजानुसार या मायक्रो एसयुव्ही पंच कारमध्ये ७.० इंच टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, चौरस आकाराचा AC, थ्री-स्पोक फ्लैट बॉटम स्टीयरिंग व्हील, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, डिजिटल टेकोमीटर आणि एनालॉग स्पीडोमीटर हे फीचर्स असणार आहेत.
यासोबतच या एसयुव्हीमध्ये १.२ लीटरची क्षमता असणारे पेट्रोल इंजिन असू शकते जे ८३bhp ची पॉवर आणि ११४Nm पर्यंतचा टॉर्क निर्माण करू शकेल. या इंजिन सोबतच स्पीड मैनुअल ट्रांसमिशन गियरबॉक्स देखील असेल. कंपनी ऑटोमेटिक गियरबॉक्ससोबत या पंच कारला बाजारात आणू शकते. या एसयूवीमध्ये नॅचरल एस्पायर्ड सोबतच टर्बो इंजिनसुद्धा असणार आहे.
किंमत किती असेल?
‘टाटा’कडून निर्मिती करण्यात आलेल्या या ‘मायक्रो एसयुव्ही पंच कार’ची किंमत ही ४-५ लाखापर्यंत असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बाजारात मायक्रो एसयुव्ही पंच कार ही मारुती इग्निस आणि होंडा कडून निर्मिती करण्यात आलेल्या छोट्या ‘एसयुव्ही केस्पर’ या मॉडेलला टक्कर देऊ शकते.