नीरज राऊत, निखिल मेस्त्री (पालघर)

प्राचीन काळापासूनची आदिवासींची संस्कृती, चालीरिती परंपरा व सामाजिक सलोखा जपणारा वाघोबा उत्सव पालघरमधील वाघोबा खिंड येथे उत्साहात पार पडला. खासदार राजेंद्र गावीत, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, वाघोबा उत्सवाचे अध्यक्ष महेश कोती, उपाध्यक्ष मनोहर दांडेकर, विविध राजकीय पक्षाचे, आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी व आदिवासी बांधव या प्रसंगी उपस्थित होते.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे

पालघर- मनोर मार्गावर असलेल्या वाघोबा खिडिंत वाघोबा, भिलोबा, मेघोबा आदिवासी देवस्थान धर्मदाय संस्था व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी वाघोबा उत्सव उत्साहात आयोजन करण्यात आले. पालघरच्या पूर्वेला वाघोबा खिडिंत वाघोबा या देवाचे मंदिर आहे. या उत्सवा दरम्यान चहाडे नाका ते वाघोबा मंदिरापर्यंत आदिवासी बांधवानी मिरवणूक काढली होती. आदिवासी बांधव निसर्गालाच देव मानत असून गावदेव, वाघोबा, भिलोबा, निळोबा,काळोबा, मेघोबा, वाघ, मोर, शीतलदेवी, षडवाय आदी देवतांची सोंगे मिरवणुकीने वाघोबा मंदिरात आणण्यात आली होती. त्यानंतर आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. याप्रसंगी तारपासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाघोबा खिंड परिसरातील वाघोबा देवस्थानाचा वाघोबा उत्सव म्हणजे लहानग्यांपासून थोरल्यापर्यंत आदिवासी- बिगरआदिवासी बांधवांचा आनंदोत्सव असतो. या दिवशी स्वतःच्या समाजाप्रती असलेली निष्ठा व एकत्र कुटुंबपद्धतीची चालत आलेली त्यांची परंपरा याचे जिवंत उदाहरण येथे पाहावयास मिळते. परिसरात तारप्याचा घुमलेला नाद व त्या तालावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई असे या उत्सवाचे खास आकर्षण असते.

पालघरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाघोबा घाटात आपल्या संस्कृतीचा वारसा आजही इथले तरुण जपत आहेत. या उत्सवामध्ये पारंपरिक वाद्ये वाजत असताना त्यांच्या तालावर ठेका धरत मोठे- लहान भेदभाव न करता खांद्याला खांदा लावून नाचणारी बेधुंद झालेल्या या आदिवासींना पाहिल्यावर त्यांच्या समाजाची एकता व बंधुता याचे दर्शन यातून घडते. आदिवासी समाज परंपरा जपणारा समाज म्हणून आजही सर्वश्रृत आहे. निसर्ग पूजणारा हा समाज या दिवशी एकत्र येत परिसरातील प्राचीन काळापासून असलेल्या वाघोबा,भिलोबा व मेघोबा देवाची मनोभावे पूजा-अर्चा करून हा निसर्ग अबाधित ठेवण्यासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही जपत आहेत.

वाघोबा खिंड चढताना सुरुवातीला आहे ते वाघोबा देवस्थान, याच देवस्थानाच्या मागील बाजूस डोंगराळ भागात मेघोबा व खिंडीकडे चढताना वनराईत असलेले भिलोबा देवस्थान आहे. येथे प्राचीन काळापासून पाऊस पडावा यासाठी मेघदेव म्हणजेच मेघोबाचे पूजन व जागर घालायची परंपरा आहे व आजही ही पुजा परंपरागतपद्धतीने केली जाते. आदिवासी संस्कृतीची एक छाप म्हणजे भिल्ल. जंगलात राहणाऱ्या या भिल्ल देवाला अनन्यसाधारण महत्व आहे असे येथील आदिवासी बांधव म्हणतात. प्राचीन काळापासून या डोंगरात राहणाऱ्या या समाजाचे रक्षण करणारा आहे तो वाघोबा. म्हणून येथे खूप काळापासून वाघोबा देवस्थान अस्तित्वात आहे व फक्त आदिवासी समाजच नव्हे तर बिगरआदिवासीही या देवस्थानाला देवस्थानाला मानतात व कुठल्याही कार्यासाठी या देवाकडे आवर्जून येतात. त्याची मनोभावे पूजा करतात. आजही या आधुनिक युगात आदिवासी समाज आपली परंपरागत प्राचीन संस्कृती जपत असल्याचे येथील उत्सवातून दिसून येते. या उत्सवात येणाऱ्या प्रत्येक भाविकास महाप्रसाद म्हणून विशेष भोजनाची व्यवस्था केलेली असते. भोजनात मांसाहार जेवण देण्याची वेगळी प्रथा आधीपासून असल्याचे म्हटले जाते.

या उत्सवाच्या निमित्ताने आदिवासी बांधव आपली संस्कृती, रीती-चाली,परंपरा जगासमोर आणतो. त्याद्वारे तो आपल्या समाजातील ऐक्य राखण्यासाठी प्रयत्न करतो. जिल्ह्यातही असे अनेक प्रकारचे उत्सव आपल्या अर्वाचीन संस्कृतीसाठी आयोजित केले जातात. आदिवासी बांधवांचा हा उत्सव म्हणजे त्यांच्या संस्कृती आजही जिवंत ठेवण्यासाठी त्यांची सुरू असलेली धडपड आहे. या संस्कृतीचे महत्व लक्षात घेता येथील प्रशासनाने पुढाकार घेऊन ती अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. या समाजाची लोककला व लोकसंस्कृती जपण्यासाठी व ती जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे असे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे.