World Blood Donor Day 2023 : १४ जून रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी रक्तदान करणं खूप आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटनेने या दिवसाला रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. रक्तदान करण्यासाठी जनजागृती निर्माण व्हावी म्हणून २००४ सालापासून हा दिवस साजरा केला जातो.
डब्ल्यूएचओनुसार भारतात वर्षाला एक कोटी युनिट रक्ताची आवश्यकता असते. परंतु, त्याची उपलब्धता फक्त ७५ लाख युनिट आहे. २५ लाख युनिट रक्त कमी असल्याने दरवर्षी शकडो लोकांचा मृत्यू होतो. रक्तदान करून तुम्ही फक्त दुसऱ्यांचा जीव वाचवू शकता पण तुमच्या आरोग्याचीही सुधारणा होते. कोणतीही व्यक्ती किती रक्तदान करू शकते आणि रक्तदात्याला कोणकोणते आरोग्याचे फायदे होऊ शकतात, याबाबत जाणून घेऊयात.
रक्तदान करण्याचे फायदे
रक्तदान केल्यामुळे रक्त पातळ होतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्यात सुधारणा होते. अनेक रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली आहे की, रक्तदान केल्यामुळे कर्करोग आणि अन्य रोगांचा धोका कमी होतो. रक्तदान केल्यामुळे शरीरातून टॉक्सिन बाहेर फेकलं जातं. यामुळे रक्तदाताच्या बोनमेरो नवीन लाल पेशी निर्माण करतो. नवीन लाल पेशी निर्माण झाल्याने शरीर निरोगी राहतं. रक्तदान करणं पूर्णपणे सुरक्षित असतं. रक्तदाता जेवढं रक्तदान करतो, त्यानंतर २१ दिवसांत शरीरात तेव्हढच रक्त निर्माण होतं. तसंच २४ ते ७२ तासात रक्ताचं वॉल्यूम पूर्ण होतं.
रक्तदान कोण करू शकतं?
एक निरोगी व्यक्ती ज्याचं वय १८ ते ६५ वर्षांमध्ये आहे, ती माणसं रक्तदान करू शकतात. रक्तदात्याचा हिमोग्लोबिन १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि त्याचं वजन कमीत कमी ४५ किलोग्रॅम असलं पाहिजे.
कोणताही व्यक्ती किती रक्तदान करु शकतो?
रक्तदान करण्याचं प्रमाण आणि पद्धत वेगवेगळी असू शकते. रक्तदान संपूर्ण रक्ताचं ३०० मिलीलीटर असतं. याला मॅन्यूअली किंवा ऑटोमॅटिक इक्विपमेंटच्या मदतीने संग्रहित केलं जाऊ शकतं. जो रक्ताच्या विशिष्ट भागामध्ये केला जातो.
रक्त किती दिवसता दान करु शकता?
रक्तदान केल्यानंतर ३५ ते ४० दिवसांनंतर नवीन रक्त रक्त नव्याने निर्माण होतं. जर तुम्हाला पुन्हा रक्तदान करायचं असेल तर ३०-४० दिवसानंतर करु शकता.