बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना रोजच्या जीवनातील तणाव वाढलेला जाणवत आहे. अगदी तरुण मंडळींनाही या तणावामुळे अनेक गंभीर आजार होत आहेत. अशात सर्वांना मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यास सांगितले जाते. रोजच्या कामातून आपण आरोग्याची हेळसांड करतो, त्यामुळेच तणाव वाढून त्याचा परिणाम दिसून येतो. ज्या व्यक्तींना तणावाचा त्रास होतो, त्यांच्या हातात तुम्ही स्ट्रेस बॉल पाहिला असेल, हा स्ट्रेस बॉल कसा काम करतो जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्ट्रेस बॉलचे कार्य
तणावाचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे दुष्परिणाम होतो. त्यातीलच एक म्हणजे कॉर्टीसोल हॉर्मोनचे उत्पादन, कार्टीसोल हॉरमॉनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही. यासाठी जेव्हा स्ट्रेस बॉल हातात धरून प्रेस केला जातो तेव्हा तिथल्या स्नायुंवर ताण पडतो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत मिळते.

आणखी वाचा: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास होतो का? जाणून घ्या यामागचे कारण

तणाव कमी करण्यासह स्ट्रेस बॉलमुळे हाताचे स्नायू मजबुत करण्यासही मदत होते. जर हाताला एखादी दुखापत झाली असेल आणि बरी झाल्यानंतरही त्याच्या वेदना सतावत असतील तर स्ट्रेस बॉलमुळे त्या वेदनांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तसेच स्ट्रेस बॉल एक्युप्रेशरचेही काम करते. त्यामुळे स्ट्रेस बॉल वापरण्याचा सल्ला दिला जातो.