कोणत्याही व्यक्तीला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांच्याकडे आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे. हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपक्रम आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होतात. पण तरीही ते चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकत नाहीत. पण, घरच्या घरी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर आरशात पाहून बोलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमचा केवळ आत्मविश्वासच वाढत नाही, तर इतरही अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊ आरशात पाहून बोलल्याने काय फायदे होतात ते.
जर्नल ऑफ मिरर हीलिंगच्या मते, मिरर हीलिंगचे तत्त्व हे वस्तुस्थितीवर अवलंबून आहे. एखाद्या व्यक्तीने काही वेळ स्वत:चे प्रतिबिंब आरशात पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या आंतरिक भावना प्रतिबिंबित होऊ लागतात. मग त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो. जी व्यक्ती स्वतःबद्दल सकारात्मक बोलते, ती नंतर इतरांसह बोलतानाही सकारात्मक बोलू लागते. सुरुवातीला काही लोकांना आरशात पाहून डोळ्यांत डोळे घालून बोलताना अडचणी येतात; पण हळूहळू त्याची सवय होते.
थ्रेडिंग करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा भुवयांचा आकार खराब झालाच म्हणून समजा
आरशात पाहून बोलण्याचा सल्ला का दिला जातो?
या संदर्भात हेल्थशॉट्सशी बोलताना मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, जे लोक सामाजिकदृष्ट्या एकाकी असतात आणि ज्यांना इतर लोकांशी बोलण्यात संकोच वाटतो, त्यांना विशेषत: आरशात पाहून बोलण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे व्यक्तीमधील सामाजिक भीती हळूहळू कमी होते आणि स्वत:विषयीचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे त्या व्यक्तीला विश्वास वाटू लागतो की, ती पूर्णपणे आत्मविश्वासू आहे आणि तिचे सामाजिक वर्तुळ रुंद होऊ लागते. अशा परिस्थितीत माणसाच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढू लागते आणि ती आनंदी आयुष्य जगू लागते.
जाणून घ्या आरशात पाहून बोलण्याचे इतर काही फायदे…
- १) आत्मविश्वास वाढतो
आरशात पाहून बोलल्याने जीवनात एकाकीपणे जाणवणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करता येऊ शकतो. ते चार भिंतींच्या आत आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांच्यात पुन्हा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी त्यांना दिवसातून १५ मिनिटे आरशात पाहून बोलण्याचा सल्ला दिला जातो.
- २) भीती दूर होते
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, काही लोक नेहमी भीती किंवा घाबरलेल्या स्थितीत जगतात. त्यांना समूहासमोर आपले मत मांडताना संकोच वाटतो. त्यांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी त्यांना आरशात पाहून बोलण्याचा (मिरर टॉक थेरपी) सल्ला दिला जातो. या नियमित सरावाने नेहमी घाबरत असलेल्या व्यक्तीच्या मनातील विविध प्रकारचे विचार सकारात्मकतेमध्ये बदलू लागतात. त्यामुळे व्यक्तीच्या आत असलेली विविध प्रकारची भीती दूर होण्यास मदत होते.
- ३) समाजात सहज मिसळू शकतात
जेव्हा अलिप्त एकाकी जगणारी व्यक्ती आरशासमोर उभी राहून स्वतःबद्दल चांगले विचार मांडते, तेव्हा तीच सकारात्मक ऊर्जा तिच्या शरीरात साठू लागते. त्यामुळे व्यक्ती स्वत:ला उत्साही आणि उर्जेने परिपूर्ण समजू लागते. त्याच्या मदतीने तिला इतरांसमोर आपले विचार व्यक्त करण्यास संकोच वाटत नाही; ज्यामुळे तिचे सामाजिक संबंध वाढण्यासह संपर्कातील व्यक्ती वाढू लागतात.
- ४) आत्मसन्मान वाढतो
दिवसातून १५ मिनिटे आरशासमोर उभे राहून बोलल्यास व्यक्तीत आत्मसन्मानाची भावना वाढू लागते. तसेच ती कोणाचेही चुकीचे बोलणे सहन करत नाही आणि आपल्या सन्मानाबाबत सावध असते. त्याशिवाय तिच्या मनातील आत्मप्रेमाची भावना वाढते. काही काळ स्वत:च्याच प्रतिबिंबाबरोबर एकट्याने बोलून व्यक्ती स्वतःला समजून घेण्यास सक्षम होते.
- ‘मिरर टॉक’ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
- १) नकारात्मक शब्द वापरणे टाळा.
- २) तुमच्यातील विविध प्रकारचे गुण हायलाइट करा.
- ३) आपल्या भविष्यातील ध्येय, उद्दिष्टांविषयी विचार करा.