आपली त्वचा, डोळे चांगले दिसावे यासाठी सर्वच महिला मनापासून काळजी घेत असतात. त्यातही आपण लवकर वयस्कर दिसू नये यासाठीही त्यांचा अटोकाट प्रयत्न चाललेला दिसतो. मग चेहऱ्यावरील सुरकुत्या, डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळे या सगळ्यांपासून सुटका मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काहींना डोळ्यांखाली सुरकुत्या येण्याची समस्या असते. यामुळे सौंदर्यात काहीसा फरक पडतो. आपल्याला भेडसावणाऱ्या बहुतांश समस्या या अपुऱ्या झोपेमुळे उद्भवतात. पण पुरेशी झोप घेतल्यास या समस्या लवकर दूर होतात. तसेच झोपायच्या योग्य पद्धतीकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे असते. झोपण्याची स्थिती योग्य ठेवल्यास त्याचा डोळ्यांखालील सुरकुत्या कमी होण्यास निश्चितच फायदा होतो. पाहूयात हे टाळण्याचे काही सोपे उपाय…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. पाठीवर झोपा – पोटावर किंवा कुशीवर झोपल्यास त्याचा नकळत तुमच्या चेहऱ्यावर ताण पडतो. त्यामुळे चेहऱ्यावर आणि विशेषत: डोळ्याखाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ही समस्या उद्भवू नये म्हणून पाठीवर झोपावे.

२. उशीचे कव्हर बदला – तुम्ही वापरत असलेल्या उशीला कॉटनचे कव्हर असेल तर त्यानेही तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. त्यामुळे उशीला सिल्कचे कव्हर लावायचा प्रयत्न करा. यामुळे चेहरा आणि उशी यांच्यातील घर्षण कमी होईल आणि डोळ्याखाली सुरकुत्या येण्याचे प्रमाणही कमी होईल.

३. झोपताना क्रीम लावा – रात्री झोपताना चेहऱ्याला क्रीम लावून झोपा. त्यामुळे चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. झोपायला जाण्यापूर्वी सिरम कींवा क्रिम लावून हलका मसाज करा. त्याचा डोळ्यांखाली सुरकुत्या न येण्यास चांगला फायदा होईल.

४. चेहऱ्याच्या समोर एसी येणार नाही याची काळजी घ्या – चेहऱ्याच्या एकदम समोर एसी किंवा फॅन येणार नाही याची काळजी घ्या. हे वारे थेट चेहऱ्यावर पडल्यास चेहऱ्याला सूज येते. त्वचेतील आर्द्रता वाऱ्यामुळे शोषून घेतली जाते आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते.

५. अल्कोहोल घेऊ नका – झोपण्याआधी अल्कोहोल घेऊ नका, त्यामुळे तुमचा चेहरा सुजलेला दिसतो. याचे कारण म्हणजे शरीराला आवश्यक नसणारे पाणी चेहऱ्याच्या बाजूला जमा झालेले दिसते. यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know how to prevent wrinkles on face and under the eyes while sleeping at night easy tips
Show comments