Benefits of Pistachio: ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो, पण याचे इतर फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला हा आणखी आवडेल.हलवा असो वा कुठलीही गोड डिश असो पिस्ता प्रत्येक गोष्टीची चव वाढवतो. पिस्ता विशेषतः हृदयाचे आरोग्य मजबूत करण्यासाठी ओळखले जातात. हिवाळ्यात तुम्ही दररोज तीन ते चार पिस्ते खाल्ल्यास तुमचे हृदय निरोगी राहते आणि शरीर मजबूत राहते. चला जाणून घेऊया पिस्ता खाण्याचे फायदे काय आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिस्त्यामध्ये पोषक तत्वांचा समावेश

पिस्त्यात भरपूर फायबर असते आणि इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत सर्वात कमी कॅलरी असतात. त्यामुळे ते खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. फायबरसोबतच पिस्त्यात कार्बोहायड्रेट्स, अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी देखील असतात. यासोबतच पिस्ता हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याचेही म्हटले जाते. यासोबतच पिस्त्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात.

पिस्ता हृदयासाठी फायदेशीर

पिस्ता हृदयासाठी फायदेशीर आहे. कारण त्याच्या सेवनाने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते.

पिस्ता रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो

पिस्ते हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात. यामध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराला आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनवतात. यामुळे हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि फ्लूचा धोका कमी होतो.

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर

पिस्त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप चांगले आहे. पिस्त्याचे सेवन केल्याने त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार राहते. पिस्त्याचे सेवन केल्याने डोळेही निरोगी राहतात कारण त्यात आढळणारे जीवनसत्व ए आणि ई डोळ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा >> Boiled egg: सावधान, अंड उकडल्यानंतर इतक्या तासांच्या आतच खाऊन घ्या, नाहीतर होईल जबरदस्त नुकसान!

हाडे आणि मेंदूसाठी फायदेशीर

पिस्त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम आढळून येते ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. यामुळे वृद्धापकाळात सांधेदुखीपासूनही आराम मिळतो. यासोबतच पिस्त्यामध्ये अशी खनिजे आढळतात ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि मेंदू सक्रिय आणि निरोगी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know pistachio benefits for health it keep heart healthy in many ways srk
Show comments