home remedies for sneezing problem: हिवाळ्यात शिंका येणे सामान्य आहे. थंड वारे आणि कमी होत असलेल्या तापमानामुळे शिंका येऊ शकतात. शिंका येणे हे सामान्य सर्दी (Sneezing) आणि एलर्जिक राइनाइटिस (allergic rhinitis) सारख्या रोग परिस्थितीचे लक्षण असू शकते. धूळ, परागकण यांमुळे देखील शिंका येऊ शकतो. याशिवाय सर्दी, कॉर्टिकोस्टेरॉईड्स श्वास घेणे, कोरडी हवा, मसालेदार अन्न खाल्ल्यामुळेही शिंका येऊ शकते.
काहीवेळा शिंका येणे ही समस्या नसते, परंतु ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात शिंकण्याचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय ट्राय करा. घरगुती उपायांनी खूप प्रभावीपणे शिंकण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात शिंका येणे थांबवण्यासाठी उपचार कसे करावे.
मधाचा वापर ठरेल फायदेशीर (Honey)
हेल्थलाइनच्या बातमीनुसार, मध खाल्ल्याने तुम्हाला सीझनल अॅलर्जीपासून आराम मिळतो, ज्यामुळे तुम्हाला शिंका येऊ शकते. जर तुम्हाला परागकणांची ऍलर्जी असेल तर तुम्ही मध खाणे टाळावे. मध वापरण्यासाठी तुम्ही एका ग्लास कोमट पाण्यात थोडे मध मिसळून ते पिऊ शकता. शिंका येण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही मध आल्याचा चहा बनवून त्याचे सेवन करू शकता.
( हे ही वाचा: हळदीच्या सेवनाने झपाट्याने विरघळेल युरिक ॲसिड? फक्त डॉक्टरांनी सांगितलेली वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या)
हळदीने करा शिंकेवर उपचार (Turmeric for Sneezing)
संशोधनानुसार, शिंका येणे आणि नाक बंद होणे यासारख्या ऍलर्जीक राहिनाइटिसच्या लक्षणांपासून मुक्त होण्यासाठी हळद प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवते. एका ग्लास दुधात हळद टाकूनही तुम्ही हळदीचे सेवन करू शकता.
काळी मिरी, कोरडे आले, तुळस आणि वेलची चहाचे सेवन करा (pepper, dry ginger, basil and cardamom tea)
काळी मिरी एक नैसर्गिक इम्युनोमोड्युलेटर आहे जी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. ऍलर्जीमुळे येणाऱ्या शिंकेला थांबवण्यासाठी काळी मिरी फायदेशीर ठरू शकते. काळी मिरीचा वापर करण्यासाठी तुम्ही काळी मिरी चहा बनवून त्याचे सेवन करू शकता. काळी मिरी, सुंठ, तुळस आणि वेलची यांचा वापर तुम्ही चहा बनवण्यासाठी करू शकता. एलर्जीच्या लक्षणांपासून आराम मिळण्यासाठी हा गरम काळी मिरी चहा दिवसातून दोनदा प्या.