Health Benefits Of Ginger Tea : आल्याचं सेवन करणं आरोग्यासाठी किती गुणकारी असंत, हे सर्वांनाच माहित आहे. आलं इतक फायदेशीर आहे की, वर्षभर आपण याचा वापर खाण्या पिण्याच्या गोष्टींमध्ये करतो. गुलाबी थंडीपासून तळपत्या गरमीच्या सकाळी आल्याचं चहा पिणे भारतात अनेकांना आवडतं. आल्याचा चहा खोकला, सर्दीमुळे कमी झालेल्या रोग प्रतिकारशक्तीला वाढवतो. तसंच प्रदुषित वातावरणात शरीराला डिटॉक्सिफाय करतो. याशिवाय ते तुमच्या शरीरा निरोगी ठेवण्यासाठीही लाभदायक आहे. आल्याच्या चहाचं सेवन केल्यावर कोणते फायदे होतात? जाणून घेऊयात.
१) वजन कमी करतं आल्याचा चहा
आल्याचा चहा वजन कमी करण्यासाठी लाभदायक असतो. आल्यामध्ये असणारे गुणधर्म भूख नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि चरबी कमी करण्यास मदत करतं. जर तुम्ही आल्याचा चहा तुमच्या आहारात समाविष्ट करत असाल, तर हे वेगानं वजन कमी करण्यास मदत करतं.
२) आल्यात असतात भरपूर पोषक तत्व
आल्याला गुणकारी म्हटलं जातं. यामध्ये शरीराला आवश्यक असणारे प्रथिने, कॅल्शियम, लोह, सर्व प्रकारचे जीवनसत्व, फॉलिक अॅसिड, मॅग्नीज आणि कोलीनचा समावेश असतो. हे सर्व तत्व शरीराला मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.
पावसाळ्यातील आजारांपासून होते सुटका
खोकला, सर्दी, शरीरात कफ निर्माण होणे, हे सामान्य आजार आहेत. आल्याचा चहा पिल्यावर या आजारांपासून दिलासा मिळू शकतो. आल्यात अॅंटिबायोटिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीराला याचा फायदा होतो.
रक्तप्रवाह नियंत्रणात ठेवतं
जर तुम्ही हाय ब्लड प्रेशरने ग्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आल्याच्या चहाचा समावेश केला पाहिजे. जे लोक दररोज आल्याचा चहा पितात त्यांना हायपरटेंशनचा धोका कमी असतो. तसंच ब्लड प्रेशरला नियंत्रणात ठेवण्यासाठी आल्याचा चहा खूप गुणकारी आहे.
पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी होते मदत
आलं एक नैसर्गिक अॅंटिबायोटिकप्रमाणे काम करतं. खूप जास्त तेल वापरलेले पदार्थ खाल्ल्यावर पचनक्रिया बिघडते. अशातच आल्याचा चहा पिल्यावर शरीरासाठी ते फायदेशीर ठरतं. जेवणातून शरीरात येणाऱ्या बॅक्टेरिया आल्याच्या सेवनामुळं नष्ट होतात. तसंच शरीरासाठी अॅंटिसेप्टिक म्हणूनही काम करतं.
आल्याचा चहा पिण्याचे अन्य फायदे
१) सतत लघवीला जायची समस्या असेल, तर दिवसातून दोनवेळा आल्याचा चहा पिणे लाभदायक ठरू शकतं.
२) डोकेदुखीवर लगेच आराम मिळतो.
३) किडनी संबंधीत आजारांवर मात करण्यासाठी आल्याचा चहा गुणकारी आहे.
४) आल्याचं चहा पिल्यावर पचनक्रिया सुधारते.
५) आल्यामध्ये अनेक जीवनसत्व असतात. जीवनसत्व-अ, जीवनसत्व-ड, जीवनसत्व-ई.