व्हॅलेंटाइन वीकच्या प्रत्येक दिवशी प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करत असतात. ७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक दिवस खास पद्धतीने साजरा केला जातो. पहिला रोझ डे, मग प्रपोज डे, चॉकलेट डे आणि चौथ्या दिवशी असतो टेडी डे. अनेकांना हा प्रश्न पडतो की प्रेमी जोडप्यांच्या या खास दिवसांमध्ये टेडी डे का साजरा केला जातो. प्रेम आणि सॉफ्ट टॉयचे काय नाते आहे? जर तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल, तर यावेळी टेडी डे साजरा करण्यापूर्वी जाणून घ्या, टेडी डे का साजरा केला जातो आणि टेडी बेअरचा इतिहास काय आहे?
वर्षातील सर्वात रोमँटिक आठवड्याची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. यात चौथा दिवस म्हणजेच १० फेब्रुवारी टेडी डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी आपल्या जोडीदाराला सॉफ्ट टॉय देऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
यंदाचा व्हॅलेंटाइन वीक ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी ठरणार खास; मनातील इच्छा होणार पूर्ण
टेडीबेअरचा इतिहास
१४ नोव्हेंबर १९०२ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती थियोडोर रुजवेल्ट मिसिसिपीच्या एका जंगलात शिकारी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत सहाय्यक हॉल्ट कोलीर सुद्धा होता. या ठिकाणी कोलीर याने काळ्या रंगाच्या एका जखमी अस्वलाला पकडले आणि त्याला झाडाला बांधले. यानंतर सहाय्यकाने राष्ट्रपतींकडे अस्वलाला गोळी मारण्याची परवानगी मागितली. मात्र अस्वलाला जखमी अवस्थेत बघून राष्ट्रपतींना वाईट वाटले. त्यांनी या जनावराची हत्या करण्यास नकार दिला. १६ नोव्हेंबरला ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ वृत्तपत्रात या घटनेवर आधारित एक छायाचित्र छापून आले, जे व्यंगचित्रकार क्लिफोर्ड बॅरिमन यांनी बनवले होते.
टेडी हे नाव कसे पडले?
वृत्तपत्रातील चित्र पाहून, व्यापारी मॉरिस मिचटॉम यांना अस्वलाच्या पिल्लाच्या आकारात खेळणी बनवण्याची कल्पना सुचली. त्यांनी आपल्या पत्नीसोबत त्याची रचना केली. या खेळण्याचं नाव टेडी असं ठेवण्यात आलं. या खेळण्याचं नाव टेडी ठेवण्यामागचं कारण म्हणजे राष्ट्रपती रुजवेल्ट याचे टोपणनाव टेडी असे होते. हे खेळणे राष्ट्रपतींना समर्पित होते, म्हणून व्यावसायिक जोडप्याने त्यांचे नाव वापरण्याची परवानगी घेऊन हे खेळणे बाजारात आणले.
‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ! शेंगदाणे विकणारा व्यक्ती रातोरात बनला स्टार
का साजरा केला जातो टेडी डे?
अमेरिकी राष्ट्रपती थियोडोर रुजवेल्ट यांच्यामुळे आणि त्यांच्या टोपणनावामुळे टेडीबेअरचा अविष्कार झाला. एका व्यावसायिक जोडप्याने ते बनवले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत आहेत. बहुतांश मुलींना सॉफ्टटॉय आवडतात. मुलं आपल्या प्रेयसीला हे टेडीबेअर भेट म्हणून देऊन यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच १० फेब्रुवारीला टेडी डेचा देखील व्हॅलेंटाईन वीकमध्ये समावेश करण्यात आला.