पांढरे शुभ्र आणि चमकणारे दात सर्वांनाच आवडतात. दात स्वच्छ ठेवण्यासाठी लोक दिवसातून दोनदा ब्रश करतात पण ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती हे फार कमी लोकांना माहीत असते. जर तुमचे दात पिवळे किंवा घाणेरडे दिसले तर ते तुमच्या समोरच्या व्यक्तीवर तुमची चुकीची छाप पाडतात. खराब दात तुमचे व्यक्तिमत्व तर खराब करतातच शिवाय अनेक आजारांनाही कारणीभूत ठरतात.
आपण सर्वजण दिवसातून दोनदा ब्रश करतो पण ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती? आपल्यासाठी कोणती पेस्ट चांगली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. जर तुम्ही तुमच्या तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यामुळे तुमचे दात तर खराब होतातच शिवाय श्वासाची दुर्गंधी, हिरड्या कमकुवत आणि अनेक गंभीर आजार होतात. एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती वेळा ब्रश करावे आणि ते करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे हे जाणून घ्या…
( हे ही वाचा: हिवाळ्यात गरमा गरम हळद दुध का प्यावे? जाणून ते घ्या पिण्याची योग्य वेळ)
३ मिनिटे करा पण..
प्रत्येक वेळी ४ मिनिटे ब्रश केल्याने दात व्यवस्थित साफ करता येतात, असे डॉक्टर सांगतात. परंतु, हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपण दिवसातून २ पेक्षा जास्त वेळा ब्रश करणे टाळले पाहिजे. दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ ब्रिस्टल ब्रशचा वापर करावा. कारण यामुळे आपल्या दातांना आणि हिरड्यांना इजा होत नाही. दिवसातून 2 ते ३ मिनिटे ब्रश केल्याने आपल्या दातांवरील प्लेक सहज निघून जातो आणि आपले दात चमकदार आणि मजबूत होतात.
फायदे
- हिरड्यांशी संबंधित आजार होत नाहीत
- तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो
- दातांमध्ये पोकळी निर्माण होत नाही
- प्लेकची समस्याही संपते
( हे ही वाचा: शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल ‘या’ ३ आयुर्वेदिक टिप्सने कमी करा; मिळेल झटपट आराम)
‘ही’ टूथपेस्ट वापरा
तुमचे दात स्वच्छ करण्यासाठी नेहमी योग्य प्रमाणात फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा. प्रौढ लोकांच्या टूथपेस्टमध्ये १३५० पीपीएम फ्लोराइड आणि ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी १००० पीपीएम फ्लोराइड असणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या मते, ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना ब्रश करण्यासाठी एक दाण्याऐवढी टूथपेस्ट द्यावी.
‘या’ चुकीमुळे तुमचे दात कमकुवत होऊ शकतात
लक्षात ठेवा, कोणतेही आम्लयुक्त पदार्थ किंवा पेयपिल्यानंतर लगेच ब्रश करू नका. कारण असे केल्याने दातांची इनॅमल कमकुवत होते, त्यामुळे दात कमकुवत होऊ लागतात. वास्तविक, इनॅमल हा दातांच्या वर एक पातळ थर असतो जो संरक्षक कवच म्हणून काम करतो. दातांना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवणे हे त्याचे काम आहे.